Thursday, April 25, 2024

Latest Posts

शिळ्या भातापासून झटपट तयार करा भात वडे…

आपल्या नेहमीच्या आहारात भाताचा समावेश हा हमखास असतोच. भात खाल्ल्याशिवाय आपले जेवण पूर्ण झाले असे कोणालाही वाटत नाही. भात हा तांदळापासून तयार होतो.

आपल्या नेहमीच्या आहारात भाताचा समावेश हा हमखास असतोच. भात खाल्ल्याशिवाय आपले जेवण पूर्ण झाले असे कोणालाही वाटत नाही. भात हा तांदळापासून तयार होतो. अनेक लोक भाताचे विविध प्रकार तयार करून त्यावर ताव मारतात. भातापासून आपण अनेक चविष्ट प्रकार तयार करू शकतो. भातापासून आपण पुलाव भात, तांदळाची खीर, तांदुळाचे पापड, तांदुळाची भाकरी असे अनेक पदार्थ बनवतो. बरेच लोक जेवणात प्रचंड प्रमाणात भात खातात. डाळ, आमटी, वरण यांसारख्या अनेक पदार्थांसोबत आपण भात खातो.

भारतातील प्रत्येक घरात जेवताना ताटात भात हा लागतोच. नेहमीच्या आहारात भाताला भरपूर महत्व आहे. भात खाल्ल्यावर अनेकांना आपले पोट भरल्यासारखे वाटते. परंतु काहीवेळा आपण केलेला भात हा भरपूर प्रमाणात शिल्लक राहतो. कधी कधी हा उरलेला शिळा भात आपण तेल मसाल्यात गरम करून फस्त करतो. परंतु नेहमी तेच खाऊन कंटाळा येतो. मग अशा वेळेस या शिळ्या भाताचे करायचे काय असा प्रश्न आपल्या समोर उभा राहतो. अनेकदा आपण हा उरलेला शिळा भात फेकून देतो. म्हणूच आज आम्ही या शिळ्या भातापासून तयार झालेली खास रेसिपी फक्त तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ही रेसिपी आहे “भात वड्यांची”. भात वडे हे शिळ्या भातापासून तयार केले जातात व चवीला देखील अगदी चविष्ट असतात. चला तर मग जाणून घेऊयात भात वडे हे तयार करायचे तरी कसे?

भात वडे तयार करण्यासाठी लागणारे साहित्य –

उरलेला भात – १/२ कप
बेसन – २ टेबलस्पून
गव्हाचे पीठ – २ टेबलस्पून
मक्याचे पीठ – ३ टेबलस्पून
तांदुळाचे पीठ – ३ टेबलस्पून
बाजरीचे पीठ – ४ टेबलस्पून
जिरे पावडर – २ टेबलस्पून
बारीक चिरलेली कोथिंबीर – ३ टेबलस्पून
चिली फ्लेक्स – १ टेबलस्पून
धणे पावडर – १ टेबलस्पून
मीठ – चवीनुसार
तेल – ५ ते ६ टेबलस्पून
पाणी – गरजेनुसार

भात वडे बनवण्यासाठी पुढील कृती करावी –

सर्वप्रथम, एका मोठ्या बाऊलमध्ये उरलेला शिळा भात घ्यावा. हा भात हातांनी किंवा मॅशरच्या मदतीने कुस्करून घ्यावा. आता या मॅश केलेल्या भातात बेसन, गव्हाचे पीठ, मक्याचे पीठ, तांदुळाचे पीठ, बाजरीचे पीठ घालून घ्यावे. त्यानंतर या तयार मिश्रणात सगळ्या प्रकारचे मसाले घालून घ्यावेत. तयार मिश्रणात जिरे पावडर, बारीक चिरलेली कोथिंबीर, चिली फ्लेक्स, धणे पावडर, गरजेनुसार मीठ घालावेत. आता या तयार झालेल्या मिश्रणात गरजेनुसार पाणी घालून त्याचे घट्टसर पीठ मळून घ्यावे. पीठ मळून घेतल्यानंतर त्यावर थोडेसे तेल शिंपडून परत एकदा पीठ मळून घ्यावे. पीठ मळून घेतल्यानंतर त्याचे छोटे – छोटे गोळे करून घ्यावेत. आता एक बटर पेपर अंथरून घ्यावा. त्यानंतर हाताला थोडेसे तेल लावून पिठाचा एक गोळा घेऊन तो हातांनी थापून घ्यावा. थापून त्याला पुरीसारखा गोल आकार द्या. आता एका कढईमध्ये तेल तापवून त्यात हे वडे दोन्ही बाजुंनी खरपूस तळून घ्यावेत.

अशा प्रकारे चविष्ट आणि खरपूस अशे भात वडे तयार आहेत. या भात वड्यांचा आस्वाद सॉस किंवा पुदिनाच्या चटणी सोबत घ्यावा.

हे ही वाचा:

‘Zara hatke zara bachke’ ने पहिल्याच दिवशी केली कोटींची कमाई!

Bigg Boss OTT’ S2 मध्ये होणार ‘या’ गायकाची Entry?

एसटी कर्मचाऱ्यांना गोड बातमी मिळणार?, Gopichand Padalkar यांनी दिली माहिती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

हे ही वाचा:

‘Zara hatke zara bachke’ ने पहिल्याच दिवशी केली कोटींची कमाई!

साराने केला शर्मिला टागोर सोबत अभिनय, व्हिडीओ सोशल मीडियावर भन्नाट व्हायरल

Bigg Boss OTT’ S2 मध्ये होणार ‘या’ गायकाची Entry?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss