spot_img
spot_img
Tuesday, October 3, 2023
spot_img
spot_img

Latest Posts

नुसता कांदा खाण्यापेक्षा ‘हे’ चटपटीत पदार्थ बनवा

वणात तोंडी लावायला कांदा असला कि जेवणाची रंगात आणखी वाढते.  आपण बऱ्याचदा जेवणात तोंडी लावायला कांद्याच्या उभ्या किंवा गोल अश्या फोडी करतो. त्या फोडींना जास्तीत जास्त तर लिंबू- मीठ लावतो. ते ही चवदार लागते.हॉटेलमध्येसुद्धा जेवणासोबत कांदा खाण्याची पद्धत आहे.

जेवणात तोंडी लावायला कांदा असला कि जेवणाची रंगात आणखी वाढते.  आपण बऱ्याचदा जेवणात तोंडी लावायला कांद्याच्या उभ्या किंवा गोल अश्या फोडी करतो. त्या फोडींना जास्तीत जास्त तर लिंबू- मीठ लावतो. ते ही चवदार लागते.हॉटेलमध्येसुद्धा जेवणासोबत कांदा खाण्याची पद्धत आहे. पण कांद्याला आणखी वेगळा स्वाद आणण्यासाठी या बघा काही सोप्या रेसिपी(recipe). यामध्ये कांद्याला चव तर छान येईलच पण त्याचं रंग- रुपही छान बदलेल. असा छान सजवलेला कांदा जेवणाच्या टेबलवर आलाच, तर खाणारेही अगदी खूश होऊन जातील. यातील प्रत्येक रेसिपीसाठी करण्याची पुर्वतयारी म्हणजे कांदा गोलाकार कापून घ्या.

मसाला कांदा(Spice Onion)
मसाला कांदा हा कांदा करण्यासाठी एका भांड्यात एक वाटी थंड पाणी घ्या. त्यात अर्धा कप व्हिनेगर टाका. त्यात पाच ते सहा लवंग, दालचिनीचा छोटासा तुकडा, दोन तेज पत्ते आणि एक टेबलस्पून किसलेलं बीट घाला. या पाण्यात कांदा १० मिनिटे भिजू द्या. त्यानंतर काढून घ्या आणि सर्व्ह(serve) करा.

दही पुदिना फ्लेवर(Curd mint flavor)
यासाठी पुदिन्याची मिक्सरमधून बारीक छान पेस्ट करून घ्या. पुदिन्याची पेस्ट जेवढी असेल तेवढेच त्यात दही घाला.थोडा चाट मसाला आणि थोडं मीठ घाला. आता या मिश्रणामध्ये कांदा भिजत घाला. नंतर १० ते १२ मिनिटांनी कांदा हा मिश्रणातून काढून घ्या आणि सर्व्ह करा.

लिंबू मसाला कांदा (Lemon Masala Onion)
एका वाटीत एक टेबलस्पून तिखट, एक टेबलस्पून गरम मसाला, एक टेबलस्पून चाट मसाला आणि २ ते ३ टेबलस्पून लिंबाचा रस टाका.आता या मसाल्यात कांद्याच्या फोडी घाला. सर्व फोडींना कांदा व्यवस्थित लागेल असं बघा आणि सर्व्ह करा.

या लेखात नमूद केलेल्या पद्धती आणि सूचनांचे अनुसरण करण्यापूर्वी, डॉक्टर किंवा संबंधित तज्ञाचा सल्ला घ्या

हे ही वाचा:

या फूड ट्रकवर मिळतायेत टेस्टी चायनीज पॅलेट्स | Cravings Food Truck | Chinese palettes

आता घरीच बनवा विदर्भ स्पेशल मेथीचे आळण

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss