spot_img
spot_img

Latest Posts

Janmashtami 2023, पारंपारिक पद्धतीने पंचामृत कसे बनवायचे? घ्या जाणून

श्री कृष्ण जन्माष्टमी अवघ्या एक दिवसांवर आला आहे. या वर्षी ६ सप्टेंबर रोजी हा उत्सव साजरा केला जाणार आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी पूजा नैवेद्याला खूप महत्व आहे. विशेष म्हणजे श्री कृष्णाला दही आणि दूध प्रिय असल्याने जन्माष्टमीला पंचामृत आवर्जून बनवले जाते.

श्री कृष्ण जन्माष्टमी अवघ्या एक दिवसांवर आला आहे. या वर्षी ६ सप्टेंबर रोजी हा उत्सव साजरा केला जाणार आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी पूजा नैवेद्याला खूप महत्व आहे. विशेष म्हणजे श्री कृष्णाला दही आणि दूध प्रिय असल्याने जन्माष्टमीला पंचामृत आवर्जून बनवले जाते. हिंदू धर्मातही पंचामृत कोणत्याही उपासनेसाठी पवित्र मानले जाते. देवांच्या मूर्तीला ही पंचामृताचा अभिषेक केला जातो. पंचामृत हे प्रसाद म्हणून देखील दिले जाते. पंचामृताचा जितके धार्मिक महत्व आहे तितके ते आरिग्यासाठी फायदेशीर आहे. पंचामृताचा सेवनाने शरीरात पाण्याची कमतरता जाणवत नाही.

पंचामृतात वापरले जाणारे दही, दूध हे मनाला शांती आणि शीतलता देतात. याशिवाय यातील साखर आणि मध हे ताकद ही देते. तर तूप आणि तुळस तुमच्या शरीरातील अनेक आजारापासून दूर ठेवण्यात मदत करते. गोडपणाबरोबर यामुळे कृष्ण जन्माष्टमीला घरच्या घरी पंचामृत कसे बनवायचे जाणून घेऊयात.

साहित्य –

१ ग्लास दूध
१ ग्लास दही
१ टिस्पून तूप
३ टिस्पून मध
साखर (चवीनुसार)
८ ते १० तुळशीची पानं
ड्रायफ्रुट्स

कृती –

सर्वप्रथम पंचामृत बनवण्यासाठी एका स्वच्छ भांडे घ्या. त्या स्वच्छ भांड्यात दही हे चांगले फेटून घ्या. त्यानंतर त्यात दूध टाकून ते मिक्स करून घ्या. त्यानंतर मध, साखर आणि तूप याचे एकत्र मिश्रण एकजीव करून घ्या. हे मिश्रण एकजीव झाल्यावर त्यात ८ ते १० तुळशीची पाने घाला. ड्रायफ्रुट्सह ही स्वच्छ धुवून घ्या . ड्रायफ्रूट स्वच्छ धुवून झाल्यावर ते सर्व ड्रायफ्रूट त्या मिश्रणात टाका. ते सर्व एका वाडग्यात काढून घ्या. तयार आहे सोप्या पद्धतीने बनवलेले पंचामृत.

 

हे ही वाचा: 

Fruit Food Custard बनवा अगदी सोप्या पद्धतीने!

नाश्त्यासाठी बनवा हेल्थी आणि टेस्टी नाचणीचं सूप, वाचा रेसिपी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss