spot_img
spot_img

Latest Posts

Janmashtami 2023, यंदाच्या वर्षी घरच्या घरी बनवा पारंपरिक पद्धतीने गोविंद लाडू

कृष्ण जन्माष्टमी हा सण भारतामध्ये खूप आनंदाने साजरा केला जातो. या दिवशी भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला होता.

कृष्ण जन्माष्टमी हा सण भारतामध्ये खूप आनंदाने साजरा केला जातो. या दिवशी भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. हा सण भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला श्री कृष्णाचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडीचे आयोजन केले जाते. दहीहंडी हा सण भगवान श्रीकृष्णाच्या उपासनेचा भाग मानला जातो. भारतात अनेक ठिकाणी दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले जाते. गोविंद लाडूला जन्माष्टमीत विशेष महत्व आहे. याला सुदाम लाडू म्हणून देखील ओळखले जाते. चला तर मग आज बघूया पारंपरिक गोविंद लाडू कसे तयार करायचे.

साहित्य –

  • २ वाटी पोहे
  • १ वाटी भाजलेले शेंगदाणे
  • दीड वाटी किसलेले खोबरे
  • १ वाटी किसलेले गुळ
  • १ टेबलस्पून जायफळ पुड
  • १ टेबलस्पून तूप
  • ४ ते ५ काजू, बदाम, मनुके
  • १ चमचा खसखस

कृती –

सर्वप्रथम कढईमधे शेंगदाणे भाजून घ्यावे. शेंगदाणे भाजून झाल्यावर ते एका ताटात काढून घ्यावे. त्यानंतर कढईमध्ये पोहे सहा ते सात मिनिटे भाजून घेऊन ते ही काढुन घ्यावे . नंतर किसलेले खोबरे भाजून घ्यावे ते ही थोडे लालसर भाजून झाले की काढून घ्या. कढईमध्ये तूप घालावे आणि ड्रायफ्रूट्स घाला व खसखस परतवून घ्यावे. आता पोहे मिक्सरला बारीक करा. शेंगदाणे बारीक करून घ्या आणि काजू, बदाम आणि मनुके सर्व साहित्य मिक्सरला थोडेसे बारीक करून घ्या. त्यानंतर ते एका बाऊल मध्ये काढा. त्यात किसलेला गुळ , वेलदोडे जायफळ पूड आणि तूप घाला. हे सर्व मिश्रण एकजीव करून झाले, की मग त्यांचे हाताने मस्त लाडू तयार करून घ्यावे. हे लाडू खूप पौष्टिक असतात आणि ते खूप दिवस टिकतात. हे लाडू हवा बंद डब्यात एक ते दीड महिना टिकतात. अश्या प्रकारे आपले पौष्टिक गोविंद लाडू तयार होतात.

हे ही वाचा: 

रामचरण आणि त्याच्या पत्नीने लाडक्या लेकीसोबत पूर्ण केलं पहिलं वरलक्ष्मी व्रत, पाहा काही फोटोज…

शरद पवारांनी केला गंभीर आरोप, मुंबईच्या सूचनेनंतर पोलिसांची लाठीचार्ज…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss