देशात सणासुदीची लगबग (Festive Season) सुरु आहे. दिवाळी (Diwali 2023) काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. दरवर्षी सणासुदीच्या काळात मिठाई (Sweets) चा खप अनेक पटींनी वाढतो. सणासुदीत मिठाईचा खप वाढल्याने खाद्यपदार्थांमध्ये भेसळीचा धोकाही लक्षणीय वाढतो.
या पार्श्वभूमीवर येत्या हंगामात मिठाईची वाढती मागणी लक्षात घेऊन भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण ने काही महत्त्वपूर्ण मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. FSSAI ने दुकानदारांना या सणासुदीच्या काळात दुकानदारांना खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना दिल्या आहेत. FSSAI ने देशभरात 4000 राज्यस्तरीय अधिकाऱ्यांना दुकानदारांवर निगरानी ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
सणासुदीच्या काळात बनावट मिठाईचा धोका!
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, दिवाळी (Diwali 2023) किंवा सणासुदीच्या काळात बाजारात विकल्या जाणाऱ्या मिठाई (Sweets) त मोठ्या प्रमाणात भेसळ होत असल्याचं दिसून येतं. भेसळ करताना खाद्यपदार्थांमध्ये जास्त प्रमाणात स्टार्च मिसळला जातो. स्टार्चचे जास्त प्रमाण मूत्रपिंड आणि यकृतासाठी अत्यंत हानिकारक आहे.
मिठाईमध्येही फॉर्मेलिनचा वापर
कधी-कधी मिठाईमध्ये फॉर्मेलिनचाही वापर केला जातो. फॉर्मेलिन (Formalin) वापर सामान्यतः मृतदेह दीर्घकाळ टिकवण्यासाठी केला जातो. मिठाई (Sweets) मध्ये फॉर्मेलिन सारखे केमिकल वापरणे अत्यंत हानिकारक असून ते घातक आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवती महिलांसाठी हे अत्यंत हानिकारक आहे. यामुळे त्यांचा जीवही जाऊ शकतो.
आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला
यामुळे आपल्या आरोग्यावर याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. यामुळे स्त्रियांना गरोदरपणामध्ये काही समस्या उद्भवू शकतात किंवा दिव्यांग मूल जन्माला येऊ शकते. त्यामुळे आईच्या जीवालाही धोका निर्माण होऊ शकतो. अशा मिठाई वृद्ध व्यक्तींच्या आरोग्यासाठी देखील खूप धोकादायक ठरू शकतात. बनावट मिठाईपासून कसं वाचाल?
हे ही वाचा :
‘बिग बॉस’च्या घरात अंकिता लोखंडे आणि विकी जैनमध्ये वाद
संजय राऊत यांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल, मुख्यमंत्री भाजपची भांडी घासतात…
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .