भगवान शिव यांना समर्पित केलेला पवित्र हिंदू सण म्हणजे महाशिवरात्र भगवान शिव यांना समर्पित केलेला पवित्र हिंदू सण महाशिवरात्री हा उपवास आणि प्रार्थनेचा काळ आहे. या शुभ प्रसंगी उपवास करताना, धार्मिक रीतिरिवाजांशी सुसंगत असे पौष्टिक पदार्थ खाणे आवश्यक आहे. पारंपारिक उत्सवाच्या पदार्थांमध्ये, खीरचे एक विशेष स्थान आहे. तुमच्या व्रतासाठी तयार केलेल्या या खीरने तुमचा महाशिवरात्री उत्सव अधिक आनंददायी करू शकता.
महाशिवरात्रीला तुम्ही साबुदाण्याची खीर बनवू शकता. साबुदाणा जलद ऊर्जा प्रदान करतो आणि पचनास मदत करतो, ज्यामुळे धार्मिक उपवासाच्या वेळी तो एक उत्तम पर्याय आहे. साबुदाण्याची खीर बनवण्यास सोपी आणि चविष्ट असा पदार्थ आहे.
- महाशिवरात्रीसाठी खास साबुदाणा खिरीचे साहित्य:
- साबुदाणा – १ कप
- दूध – ३ कप
- साखर – १/२ कप (स्वादानुसार कमी-जास्त करू शकता)
- तूप – १ चमचा
- वेलची पूड – १/२ चमचा
- काजू, बदाम, पिस्ता – १ चमचा (आवश्यकतेनुसार)
- केशर – १ चिमूट (आवश्यकतेनुसार)
- पाणी – १ कप (साबुदाणा शिजवण्यासाठी)
साबुदाणा खारीची कृती :
एका भांड्यात साबुदाणा घेऊन तो स्वच्छ पाण्याने धुवून ४ ते ५ तास भिजवत ठेवा. एका कढईत तूप गरम करा. त्यात काजू, बदाम, पिस्ता घालून सोनेरी रंग येई पर्यंत तळा. त्यानंतर हे मिश्रण काढून ठेवा. त्यानंतर एक कढई घ्या त्यात साबुदाणा आणि पाणी घालून मध्यम आचेवर शिजवायला ठेवा.साबुदाणा पूर्णपणे शिजला की त्यात दूध घाला आणि उकळायला ठेवा. त्या खिरीला उकळी आली की त्यात साखर घालून मिश्रण चालवत ठेवा. साखर पूर्णपणे विरघळली की खीर घट्ट होईल. ५-१० मिनिटे मध्यम आचेवर उकळून खीर घट्ट झाल्यावर त्यात वेलची पूड आणि केशर घालून मग त्यात तळलेले काजू, बदाम, पिस्ता घालून मिश्रण चांगले एकजीव करा. गरम किंवा थोडी थंड झाल्यावर खीर सर्व्ह करा.