Mahashivratri 2025 : बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या थंडाई उपलब्ध असतात. थंडाई हा एक पारंपरिक भारतीय पेय आहे, जो विशेषतः महाशिवरात्री किंवा अन्य उत्सवांच्या काळात प्यायले जाणारे लोकप्रिय पेय आहे. यामध्ये दूध, निळा गुलाब, बदाम, पिस्ता, साखर, खसखस, केशर आणि मसाले यांचा समावेश असतो. या पेयामुळे शरीराला थंडावा आणि ऊर्जा मिळते. सुकामेव्याचा समावेश करून हे पौष्टिक पेय आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते.
थंडाईमध्ये केशर आणि खसखस यांसारखी शीतलतादायक घटक असतात, ज्यामुळे शरीरातील उष्णता कमी होऊन शरीराला थंडाव मिळतो. थंडाईमध्ये असलेल्या मसाल्यांमध्ये अँटीऑक्सिडेंट्स असतात, जे शरीरातील फ्री रॅडिकल्सपासून सुरक्षा देतात आणि एकूणच शरीराची क्षमता वाढवतात. असे पौष्टिक पेय कसे तयार करायचे, जाणून घेऊया रेसिपी….
थंडाई बनवण्याचे साहित्य :
- १ लिटर दूध
- साखर (स्वादानुसार कमी-जास्त करू शकता)
- १०-१२ बदाम
- १०-१२ पिस्ता
- १ चमचा खसखस
- १/२ चमचा वेलची पूड
- १ चमचा केशर
- १ चमचा गुलाब पाणी
- १/२ कप फ्रेश क्रीम (ऐच्छिक)
- १-२ थेंब गुलाब अर्क (ऐच्छिक)
- १/४ कप दूध (केशर भिजवण्यासाठी)
थंडाई बनवण्याची कृती :
सर्वात पहिले बदाम, पिस्ता, खसखस मिक्सर मध्ये टाकून बारीक पावडर करून घ्या. १/४ कप दूध उकळा आणि त्यात केशर टाका, त्याला काही मिनिटे भिजू द्याव. पावडर केलेले बदाम, पिस्ता, खसखस यात गुलाब पाणी घालून पेस्ट तयार करा. त्यानंतर त्यात वेलची पूड, गुलाब अर्क आणि केशर घालून मिश्रण तयार करा. मग एक लिटर घेऊन ते मंद आचेवर उकळून घ्या. दूध उकळत असताना त्यात तुमच्या आवडीनुसार साखर घाला. उकळलेले दूध थंड झाल्यावर त्यात तयार केलेले पेस्ट घाला. चांगले मिक्स करा आणि चव चेक करा, साखर कमी-जास्त झाल्यास त्याचा समतोल नीट करा. थंडाई २-३ तास फ्रिज मध्ये ठेवा जेणेकरून ते चांगले थंड होईल. थंडाई गार गार सर्व्ह करा. सजावटीसाठी बदाम, पिस्ता आणि गुलाबाच्या पाकळ्यांचा वापर करू शकता.
टिप्स :
हे पेय पूर्णपणे नॉन-अल्कोहोलिक आहे.
तुम्ही थंडाईमध्ये फ्रेश क्रीम देखील घालू शकता, ज्यामुळे ते अधिक क्रीमी होईल.