spot_img
Monday, January 20, 2025

Latest Posts

Makar Sankranti Special Recipe : मकर संक्रांतीनिमित्त तिळाचे लाडू केलेच असतील पण संक्रांतीला कधी गुळपोळी केली आहे का? तर ही रेसिपी तुमच्यासाठी..

नव्या वर्षाची सुरुवात झाली कि मराठी सणांनादेखील सुरुवात होते. वर्षातला पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. दरवर्षी हा सण जानेवारीच्या १४ तारखेला संक्रांत हा सण साजरा करण्यात येतो. भारतात या सणाची वेगवेगळी ओळख आहे, मात्र महाराष्ट्रात मकर संक्रांत म्हणून ओळखले जाते. संक्रांती हा एक अत्यंत पवित्र आणि आनंदाचा सण आहे, जो मुख्यत: भारतात विविध प्रदेशांमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. मकर संक्रांतीला गुळ आणि तिळाचे पदार्थ खाण्याची परंपरा आहे.

संक्रांतीनंतर ऋतुबदल होत थंडी कमी होऊ लागते. बदलत्या ऋतूचा आणि थंडीचा आपल्या शरीराला त्रास होऊ नये यासाठी काही खास पदार्थ खाल्ल्यास शरीरातील उष्णता कायम राहते. संक्रांतीला तीळ आणि गुळापासून बनवलेल्या पदार्थांना अधिक महत्व दिले जाते. गुळ आणि तिळ यांचे सेवन पचनसंस्थेसाठी अत्यंत फायदेशीर असते. तिळ पचनसंस्था सुदृढ करते आणि गुळ रक्त परिसंचरण सुधारतो. यामुळे शरीराचे संपूर्ण स्वास्थ्य सुधारते आणि ऊर्जा वृद्धीला मदत होते.त्यामुळे मकर संक्रांतीला तीळ आणि गूळ पद्धत सुरु झाली.

मकर संक्रांतीला तीळ आणि गुळापासून अनेक पदार्थ बनवले जातात त्यापैकीच एक म्हणजे तिळगुळाची पोळी. ती कशी बनवायची ह्याची रेसिपी नक्की वाचा.

तिळगुळाची पोळी बनवण्याचे साहित्य :
> २ कप गव्हाचे पीठ
> १ कप तिळ (सारणासाठी)
> १/२ कप गुळ (कुस्करा)
> १/२ चमचा हळद
> १ चमचा तूप
> १/२ चमचा वेलची पावडर
> १/४ चमचा मीठ
> पाणी (आवश्यकतेनुसार)
> तूप (पोळी भाजण्यासाठी)

तिळगुळाची पोळी बनवण्याची कृती :
सारण तयार करा:

सर्वप्रथम तिळ आणि गुळ कढईत घ्या.
गुळ पाणी घालून मंद आचेवर गुळ पूर्णपणे वितळेपर्यंत उकळा.
गुळ वितळल्यावर त्यात तिळ आणि वेलची पावडर टाका.
सारण घट्ट होईपर्यंत मिक्स करा आणि गॅस बंद करा.
गुळ आणि तिळ मिक्स करून एक सारण तयार होईल.

एका वाडग्यात गव्हाचे पीठ, हळद, मीठ आणि तूप घाला.हळूहळू पाणी घालून कणिक मऊ आणि गुळगुळीत होईपर्यंत मळा.कणिक व्यवस्थित मळल्यावर त्याला २०-३० मिनिटे झाकून ठेवा. कणिक घेऊन छोटे गोळे बनवा.प्रत्येक गोळ्याचा छोटासा ठोकला करा, त्यात तिळ आणि गुळाचा सारण भरून गोळा बंद करा.नंतर त्या गोळ्याला हलक्या हाताने बेलून पोळी तयार करा. तवा गरम करून त्यावर थोडे तूप घाला.तयार केलेली पोळी तव्यावर ठेवा आणि दोन्ही बाजूने सोनेरी रंग येईपर्यंत भाजा.गुळपोळी गरम गरम सर्व्ह करा. हे गुळ, तिळ, आणि तूप यांचे संयोजन एकदम चवदार आणि पौष्टिक असते.

हे ही वाचा:

Bhau Torsekar थेट म्हणाले, Nikhil Wagle यांनी शिवसेना संपावी म्हणून पत्रकारिता केली…

Matoshree, Sanjay Raut, Uddhav Thackeray, Bhau Torsekar की… नेमकं कोण झालं बदनाम?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss