Friday, March 29, 2024

Latest Posts

२ ब्रेडच्या स्लाइसमध्ये बनवा चविष्ट Dessert

ब्रेड हा असा पदार्थ आहे जो आपण सकाळच्या नाश्त्याला ताव मारून खातो. अनेक लोक तर तिन्ही वेळच्या आहारात ब्रेडचा समावेश करतात. जेवताना सोबत पोळी नसली की त्याची जागा सुद्धा ब्रेड सहज भरून काढतो.

ब्रेड हा असा पदार्थ आहे जो आपण सकाळच्या नाश्त्याला ताव मारून खातो. अनेक लोक तर तिन्ही वेळच्या आहारात ब्रेडचा समावेश करतात. जेवताना सोबत पोळी नसली की त्याची जागा सुद्धा ब्रेड सहज भरून काढतो. ब्रेड पासून अनेक पदार्थ तयार केले जातात. सँडविच, ब्रेड रोल, ब्रेड पकोडा, रस्क किंवा गार्लिक ब्रेड हे ब्रेड पासून तयार केलेले पदार्थ लोक आवडीने खातात. परंतु ब्रेड पासून तयार झालेला मिल्क ब्रेड हा गोड आणि चविष्ट पदार्थ तुम्ही खाल्ला आहे का ?

कधी कधी आपल्याला स्वीट्स (Sweets) किंवा डेझर्ट (Dessert) तसेच काहीतरी गोड खाण्याची प्रचंड इच्छा होते. अश्यावेळी बाहेरून स्वीट्स आणणे आपल्याला परवडत नाही. त्यामुळे नेमके काय खावे आपल्याला काळत नाही. तर अश्यातच काही गोड पदार्थ उपलब्ध नसेल तर, मिल्क ब्रेड ही रेसिपी आपण घरच्याघरी सोप्या पद्धतीने तयार करू शकतो. मिल्क ब्रेड चवीला कमालीचा छान असतो. मिल्क ब्रेड कमी साहित्यात तसेच अगदी काही वेळात तयार होतो. त्यामुळेच स्वीट्स किंवा डेझर्ट तसेच काहीतरी गोड खाण्याची क्रेविंग्स आपल्याला होत असेल तर मिल्क ब्रेड हा परफेक्ट ऑप्शन आहे. चला तर मग घरातील प्रत्येकाला आवडेल अश्या व काही मिनटात तयार होणाऱ्या या गोड चविष्ट डेझर्ट ची रेसिपी पाहुयात.

मिल्क ब्रेड बनवण्यासाठी लागणारे साहित्य –

ब्रेड स्लाईस २
दूध २ कप
बटर १ चमचा
साखर
कस्टर्ड पावडर १ चमचा
टुटी-फ्रुटी १ चमचा
पुदिन्याची पाने ३-४

मिल्क ब्रेड बनवण्याची कृती –

मिल्क ब्रेड बनवण्यासाठी सर्वप्रथम, पॅन गरम करावा. पॅन गरम झाल्यानंतर त्यात एक चमचा बटर घालावे, बटर चांगले मेल्ट झाल्यानंतर त्यावर २ ब्रेड च्या स्लाईस ठेऊन दोन्ही बाजूने भाजून घ्याव्या. आता या बटर मध्ये भाजलेल्या ब्रेड च्या स्लाइस एकमेकांवर ठेवून त्यावर एक कप दूध घालावे. ब्रेड दुधात चांगले भिजवून ५ ते ६ मिनिटांसाठी लो फ्लेमवर ब्रेड शिजवून घ्यावे. ५ मिनिटे झाल्यानंतर ब्रेड स्लाईस वर चवीनुसार साखर घालावी. आता एका वाटीत दूध घेऊन, त्यात दीड चमचा कस्टर्ड पावडर घालून मिक्स करावे. कस्टर्ड पावडरचं हे मिश्रण ब्रेड स्लाईस वर घालावे, व २ मिनिटांसाठी शिजू द्यावे. अशा प्रकारे चविष्ट आणि मन तृप्त करणारे मिल्क ब्रेड खाण्यासाठी तयार आहे. सजावटीसाठी आपण त्याच्यावर टूटी-फ्रूटी व पुदिन्याची पाने घालून सर्व्ह करू शकतो.

हे ही वाचा:

मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच, नाना पटोले आणि संजय राऊत हे बोलघेवडे – देवेंद्र फडणवीस

जितेंद्र आव्हाडांनी एकनाथ शिंदेंना एका वाक्यात लगावला टोला

बांधकाम परवानगी प्राप्त भूखंडावर स्वतंत्ररित्या अकृषिक परवानगीची आवश्यकता नाही, राधाकृष्ण विखे पाटील

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss