अळूची पान आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. त्याच्यामध्ये कॅल्शियम (calcium), मॅग्नेशियम (magnesium) , पोटॅशियम (Potassium) मोठ्या प्रमाणावर आढळून येते. या पानांमुळे पचनाच्या विविध समस्या देखील दूर होतात. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अळूच्या पानाचे दोन पदार्थ आवर्जून बनवले जातात. एक म्हणजे अळूची भाजी किंवा त्यालाच मग अळूचं फदफदं देखील बोले जाते आणि अळूच्या वड्या. अळूची वडी सर्वांनाच खूप जास्त आवडते. सणासुदीला आपल्याकडे अळू वडी ही बनवली जाते. अळूवडी बनवण्यासाठी देखील खूप सोपी आहे. आपण फक्त वाफवलेली अळूवडी खाल्ली असेल पण ग्लासचा वापर करून अळूवडी कशी बनवायची हे तुम्हाला माहित आहे का , चला तर पाहुयात अळुवडी बनवण्याची सोपी पद्धत
साहित्य :-
६ ते ७ अळूची पान
बेसन १ वाटी
धणे पूड (आवश्यकतेनुसार)
जीरा पावडर (आवश्यकतेनुसार)
गरम मसाला (आवश्यकतेनुसार)
हळद (आवश्यकतेनुसार)
ओवा (आवश्यकतेनुसार)
लाल तिखट (आवश्यकतेनुसार)
हिंग (आवश्यकतेनुसार)
पांढरे तीळ (आवश्यकतेनुसार)
आलं – लसूण – हिरवी मिरची पेस्ट २ चमचे
गुळ (चवीनुसार)
चिंचेचा कोळ अर्धी वाटी
मीठ (चवीनुसार)
पाणी (गरजेनुसार)
तेल
कृती :-
सर्वप्रथम अळूची पान धुवून घ्यावी. त्यानंतर ती नीट पुसून घ्या. पुसून झाल्यानंतर त्या पानांचे देठ काढून घ्यावे. या पानांना खाज असल्यामुळे साफ करण्याच्या आधी हाताला तेल लावून घ्यावे. ही पान साफ करून झाल्यानंतर त्यावर लाटण फिरवून घ्यावं. नंतर त्या पानाचे रोल करून कापून घ्या. नंतर एका वाटीमध्ये १ वाटी बेसन टाकून घ्यावे. बेसन टाकून झाल्यानंतर त्यात दोन चमचे धणे पूड, एक चमचा जीरा पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा ओवा, एक चमचा लाल तिखट, चिमुटभर हिंग, एक चमचा पांढरे तीळ, दोन चमचे आलं – लसूण – हिरवी मिरचीची पेस्ट, २ चमचे गुळ, ४ चमचे चिंचेचा कोळ, चवीनुसार मीठ आणि पाणी टाकून नीट मिक्स करून घ्या.पीठ जास्त पातळ करू नये. आता एका मोठ्या भांड्यामध्ये कापून घेतलेली अळूची पान आणि बेसनाचं मिश्रण टाकून पुन्हा सगळं नीट मिक्स करा. मिक्स करून झाल्यानंतर २ ग्लास घेऊन त्यांना आतमधून तेल लावून घ्या. तेल लावलेल्या ग्लासानमध्ये मिश्रण ओतून घ्या. गॅसवर एका कुकरमध्ये २ ग्लास पाणी घालून, त्यावर झाकण ठेऊन कुकर गरम करण्यासाठी ठेवा. पाणी गरम झाल्यानंतर दोन्ही ग्लास कुकरमध्ये ठेवून घ्या आणि कुकरला झाकण लावून बंद करा. कुरकरच्या २ ते ३ शिट्या झाल्यानंतर थंड होण्यासाठी ठेवा. वडी थंड झाल्यानंतर त्याचे सुरीने तुकडे करून घ्या. एका कढईत तेल गरम करायला ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यात अळूवडी टाकून तळून घ्या. अशा प्रकारे सोप्या पद्धतीने अळूवडी तयार आहे.
हे ही वाचा:
Asia Cup 2023, IND vs PAK रंगणार महामुकाबला, कधी, कुठे पाहणार सामना?
‘राष्ट्रीय पोषक सप्ताह’ का साजरा केला जातो? जाणून घ्या सविस्तर