Friday, June 2, 2023

Latest Posts

बनवा नारळाच्या मलाईची खीर, पचनास अगदी हलकी!

कोकोनट क्रीममध्ये फायबर (fiber) आणि अनेक अँटीऑक्सिडंट्स (Antioxidants) मोठ्या प्रमाणात असतात. यामुळे कोकोनट क्रीमचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी व्यवस्थित राहते.

कोकोनट क्रीममध्ये फायबर (fiber) आणि अनेक अँटीऑक्सिडंट्स (Antioxidants) मोठ्या प्रमाणात असतात. यामुळे कोकोनट क्रीमचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी व्यवस्थित राहते. तसेच कोकोनट क्रिम मध्ये कार्बोहायड्रेट्स (Carbohydrates) चे प्रमाण कमी असल्याने वजन देखील वाढत नाही. लोक नारळ पाणी पितात परंतु नारळातील मलाई अनेकदा फेकून देतात. परंतु याच क्रीमपासून आपण पौष्टिक खीर बनवू शकतो हे आपणास माहीत आहे का ? चला तर मग आज बघूयात कोकोनट क्रीमपासून म्हणजेच नारळातील मलई पासून खीर कशा प्रकारे बनवली जाते.

ही नारळापासून बनवलेली क्रीमी खीर आपण झटपट बनवू शकतो. तसेच ही चविला देखील अगदी चविष्ट असते. नारळ खीरीचे सेवन केल्याने आपली पचनसंस्था चांगली राहते. तसेच या खीरीचे सेवन केल्यामुळे आपण प्रचंड एनर्जेटिक (Energetic) राहतो.चला तर मग जाणून घेऊया नारळाच्या मलाई खीरीची चविष्ट रेसिपी.

साहित्य –

  • तूप १ टेबलस्पून
  • दूध किंवा नारळाचे दूध २ कप
  • साखर १/४ कप
  • काजू २ टेबलस्पून
  • बदाम २ टेबलस्पून
  • मनुका २ टेबलस्पून
  • वेलची पावडर १/४ टीस्पून
  • नारळ क्रीम १/२ कप
  • नारळ पाणी १/२ कप
  • भाजलेले शेंगदाणे

नारळाची मलाई खीर बनवण्याची कृती –

नारळाच्या क्रीमची खीर बनवण्यासाठी प्रथम एका कढईत तूप घालून मध्यम आचेवर ठेवावे.नंतर त्यात बदाम आणि काजू घालून गोल्डन होईपर्यंत परतून घ्यावे.त्यानंतर त्यात मनुका घालून सुमारे १५ ते ३० सेकंद परतून घ्यावे. परतून घेतलेलं सर्व मिश्रण एका प्लेटमध्ये बाहेर काढून बाजूला ठेवावे.यानंतर त्याच कढईत दूध टाकून उकळायला ठेवावे.नंतर दूध उकळून अर्धे होईपर्यंत गरम करत रहा.दूध अर्धे झाल्यावर त्यात साखर आणि वेलची पूड घालून चांगले मिक्स करावे. नंतर गॅस बंद करून मिश्रण पूर्णपणे थंड होऊन द्यावे. यानंतर थंड खीर मध्ये नारळाचे क्रीम, नारळ पाणी आणि भाजलेले शेंगदाणे घालावे.मग या सर्व गोष्टी मिसळून खीर थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवावी.

अशा प्रकारे नारळाच्या मलाईची चविष्ट खीर तयार आहे.

हे ही वाचा:

Manipur मध्ये माजी आमदाराने भडकवली दंगल, तब्बल ५ दिवसांसाठी इंटरनेट सेवा बंद

जयंत पाटलांना #ED चौकशीत घेऊन कोणाचा कार्यक्रम कोण करतंय? Who is targeting |

ईडीकडून नोटीस मिळाल्यावर शक्तिप्रदर्शन करण्याचा नवीनच पॅटर्न – संजय शिरसाट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss