Saturday, June 3, 2023

Latest Posts

चविष्ट Dosa बनवा हटके स्टाईलने…

लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वानाच डोसा खूप आवडतो. मसाला डोसा खाण्याचा मोह तर कोणालाच आवरत नाही. गरमागरम डोसा चटणी आणि सांबार सोबत खाण्याची बातच काही और असते.

लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वानाच डोसा खूप आवडतो. मसाला डोसा खाण्याचा मोह तर कोणालाच आवरत नाही. गरमागरम डोसा चटणी आणि सांबार सोबत खाण्याची बातच काही और असते. अनेकांना डोसा मस्त कुरकुरीत असला की त्यावर बटर किंवा तूप असेल तरीही चालते. परंतु डोसा म्हंटल की ते बनवण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. डाळ-तांदूळ भिजवणे मग ते वाटणे आणि ते आंबवणे अशी पराकोटीची मेहनत घावी लागते. यामध्ये भरपूर वेळ निघून जातो. पण डोसा करण्याचा विचार मनात आला की डोसा बनवून तो फस्त केल्या शिवाय आपण राहत नाही. चला तर मग जाणून घेऊयात झटपट तयार होणाऱ्या खमंग डोस्याची रेसिपी.

रात्री पीठ न आंबवता हा भन्नाट डोसा आपण तयार करू शकतो. विषेशतः या डोस्यामध्ये डाळींचे प्रमाण जास्त असल्याने नेहमीच्या डोस्यांपेक्षा हा डोसा चविष्ट आणि हेल्दी होतो. तसेच यामुळे शरीराला अनेक प्रोटिन्स मिळतात. शरीराला प्रोटीन्स मिळणे हे शरीरासाठी अतिशय आवश्यक आणि चांगले असते.अनेकांना कुरकुरीत डोसा आवडतो. लहान मुलांना तर कुरकुरीत डोसा खाण्यात वेगळीच मज्जा येते. नेहमीच्या डाळ-तांदूळाचा डोसा पाहिजे तितका कुरकुरीत होत नाही, मात्र हा डोसा मस्त कुरकुरीत होत असल्याने सगळेच आवडीने खातात. चला तर मग जाणून घेऊयात जबरदस्त चविष्ट डोसा बनवण्याची रेसिपी.

साहित्य –

तूर डाळ – अर्धी वाटी
मूग डाळ – अर्धी वाटी
मसूर डाळ – अर्धी वाटी
उडीद डाळ – अर्धी वाटी
हरभरा डाळ – अर्धी वाटी
पोहे – १ वाटी
मेथ्या – १ चमचा
तांदूळ – १ वाटी

कृती –

दिलेल्या साहित्यानंमधील गोष्टी त्याच प्रमाणात घेऊन रात्रभर पाण्यात भिजवून घ्याव्यात. रात्र भर पाण्यात भिजवलेले मिश्रण सकाळी व्यवस्थित मिक्सर मध्ये मिक्स करून घ्यावे. यामध्ये मीठ घालून आवश्यकतेनुसार पाणी घालून पीठ एकजीव करावे. आवडत असेल तर यामध्ये आपण गाजर, कोबी, कांदा, टोमॅटो यांसारख्या बारीक चिरलेल्या भाज्याही घालू शकतो. जेणेकरून जीवनसत्वांचा देखील समावेश आपल्या शरीरात डोस्याच्या मार्फत होईल. तसेच आलं-लसूण-मिरची पेस्ट, कोथिंबीर, ओवा, जीरे असे मसाल्याचे पदार्थ घालून डोस्याना भन्नाट स्वाद हि आपण देऊ शकतो. अशा प्रकारे जबरदस्त चविष्ट डोसा खाण्यासाठी तयार आहे.

हे ही वाचा : 

त्र्यंबक ग्रामस्थांकडून पडदा टाकण्यात येत असतानाच, नितेश राणे पोहोचले मंदिरात केली महाआरती

२६ मे रोजी छ. संभाजीनगर जिल्ह्यात एकनाथ शिंदे घेणार जाहीर सभा

Neeraj Chopra ने रचला जागतिक स्तरावर इतिहास

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss