Saturday, June 3, 2023

Latest Posts

रोजच्या डाळीला बनवा जरा हटके, सोप्या पद्धतीने बनवा DAL MAKHNI

उत्तर भारतातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय रेसिपी म्हणजे दाल मखनी. दाल मखनी हा एक असा पदार्थ आहे की जो आपण पराठा, नान, रोटी, चपाती तसेच ब्रेड या सोबत चवीने खाऊ शकतो. तसेच भाता सोबत ही आवडीने खाऊ शकतो.

उत्तर भारतातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय रेसिपी म्हणजे दाल मखनी. दाल मखनी हा एक असा पदार्थ आहे की जो आपण पराठा, नान, रोटी, चपाती तसेच ब्रेड या सोबत चवीने खाऊ शकतो. तसेच भाता सोबत ही आवडीने खाऊ शकतो. दाल मखनी पंजाब व उत्तरभारतातील अनेक विविध भागांमध्ये आवडीने खाल्ली जाते. आपल्याला रोजच्या जेवणात तीच तीच डाळ खाऊन कंटाळा येतो. म्हणूनच रोजच्या जेवणात काही तरी हटके खाण्यासाठी घेऊन आलो आहोत ‘दाल मखनी’ ची स्पेशल रेसिपी खास तुमच्यासाठी.

जेवणात दाल मखनी असणे म्हणजे एक प्रकारचे शाही जेवणच झाले. शाही जेवणाचा हा पदार्थ फक्त शाही नसून या पदार्थाचे आपल्या आरोग्यावर असंख्य चांगले फायदे होतात. दाल मखनी पौष्टिक होते ती काळे उडीद, राजमा, मसूर आणि हरभऱ्याच्या डाळींच्या एकत्रित गुणधर्मांमुळे. अनेक आहार तज्ज्ञ दाल मखनीच्या या पौष्टिकतेमुळे दाल मखनी आहारात सेवन करण्याचा सल्ला देतात. आपल्याला रोजच्या जेवणाचा कंटाळा येतो, म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी आरोग्यास फायदेशीर असलेल्या या शाही दाल मखनी ची रेसिपी घेऊन आलो आहोत. चला तर मग पाहुया ही सोपी व झटपट रेसिपी कशी तयार होते.

दाल मखनी बनवण्यासाठी लागणारे साहित्य –

काळी उडीद डाळ – १ कप
राजमा – १/४ कप
दालचिनी – १ ते २ कांड्या
तमालपत्र – २ पाने
लवंग – ४
काळी वेलची – २
लवंग – ४
मीठ
तेल – २ ते ३ चमचा
बटर – १ ते २ चमचा
कांदा – १ कप (बारीक चिरलेला)
आलं – लसूण पेस्ट – १ चमचा
हळद – १ चमचा
लाल तिखट मिरची पावडर – १ चमचा
टोमॅटो प्युरी – २ कप
गरम मसाला – १ चमचा
धणे पूड – १ चमचा
जिरे पूड – १ चमचा
पाणी – २ कप
कसुरी मेथी – १ चमचा
फ्रेश क्रिम – १ चमचा

दाल मखनी बनवण्याची कृती –

एका कुकरमध्ये काळी उडीद डाळ व राजमा दालचिनी, तमालपत्र, लवंग, काळी वेलची व पाणी घालूंन शिजवून घ्यावे. त्यानंतर एका भांड्यात तेल, बटर घालून मग त्यात बारीक चिरलेला कांदा घालून घ्यावा. हा कांदा सोनेरी होईपर्यंत परतून घ्यावा. कांदा सोनेरी भाजून झाल्यानंतर त्यात आलं – लसूण पेस्ट घालावी. आता या मिश्रणात हळद, लाल तिखट पावडर, टोमॅटोची प्युरी घालावी. त्यानंतर या मिश्रणात चवीनुसार मीठ घालूंन घ्यावे. दाल मखनीची ही ग्रेव्ही तयार झाल्यानंतर सगळ्यात शेवटी यात गरम मसाला, धणे पूड, जिरे पूड घालावी.आता या तयार झालेल्या मिश्रणात शिजवून घेतलेली उडीद डाळ व राजमा घालावा. त्यानंतर या मिश्रणात थोडे आवश्यकते नुसार पाणी घालावे. व ही तयार झालेली दाल मखनी १५ ते २० मिनिटे आणखी शिजवून घ्यावी. दाल मखनी बनून तयार झाल्यानंतर त्यात चमचाभर कसुरी मेथी, बटर आणि हिरव्या मिरच्या घालाव्यात. तयार झालेल्या या दाल मखनीची चव आणखी वाढवण्यासाठी त्यात सगळ्यात शेवटी फ्रेश क्रिम घालावी.

अशा प्रकारे शाही व आरोग्यास फायदेशीर अशी ‘दाल मखनी’ तयार आहे.

हे ही वाचा:

जितेंद्र आव्हाडांनी एकनाथ शिंदेंना एका वाक्यात लगावला टोला

बांधकाम परवानगी प्राप्त भूखंडावर स्वतंत्ररित्या अकृषिक परवानगीची आवश्यकता नाही, राधाकृष्ण विखे पाटील

बक्षिसाच्या रकमेबरोबरच मनोरंजनही होणार डबल!, २९ मेपासून सुरु होणार ‘कोण होणार करोडपती’ चे नवं पर्व

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss