घरोघरी दरवर्षी येणारा गणपती बाप्पा आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण करते. गणपतीची लगबग ही खूप दिवस अगोदर पासून केली जाते. प्रत्येक जण आपल्या आपल्या पंरपरेप्रमाणे गणपती बाप्पाची पुजा करतात. कुठे बाप्पा संपुर्ण दहा दिवस, कुठे पाच दिवस, कुठे दिड दिवस तर कुठे तर अगदी एक दिवसाकरीता देखील येतो. उत्सव कितीही दिवसांचा असला तरी बाप्पाला आवडत असणाऱ्या मोदकांच्या प्रसादा शिवाय तो उत्सव पूर्ण होतच नाही. मोदक हे लहानमुलांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांना आवडतात. वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवताना त्यात झटपट आणि स्वादिष्ट तळलेले मोदक ही तुम्ही बनवून पहा. चला तर मग जाणून घेऊया तळलेले मोदक बनवण्याची रेसिपी.
साहित्य –
२०० ग्रॅम मैदा
२०० ग्रॅम किसलेले खोबरे
२०० ग्रॅम पिठीसाखर
१ लहान चमचा वेलची पावडर
२ चमचे तेल
ड्रायफ्रुट
तूप
कृती –
सर्वप्रथम मैद्यात तेलाचे मोहन घालून थोडे थोडे पाणी घालून पीठ घट्ट मळून घ्या. एका भांड्यात खोबऱ्यांचे किस ,पिठी साखर, वेलची पावडर आणि ड्राय फ्रूट्स हे सर्व मिसळून घ्या. त्यानंतर मध्यम आचेवर हे मिश्रण शिजवा आणि मिश्रण मऊ आणि ओलसर होईपर्यंत ते ढवळत रहा. तुम्ही ताजे नारळ वापरत असाल तर त्या मिश्रणात पाणी घालू नका. तयार झाल्यावर मिश्रण थंड होण्यासाठी बाजूला ठेवा. त्यानंतर मैद्याच्या पिठाचे लहान-लहान लाट्या करा. पुर्या या लहान लहान लाटून घ्या. त्यात २-३ चमचे सारण भरून मोदकाचा आकार द्या. एका कढईतमध्ये तूप हे मध्यम गरम करून. मोदक हलके सोनेरी रंग होयपर्यंत तळून घ्या. हे मोदक एका ताटात काढून घ्या. तयार झालेले आहेत तळलेले मोदक.
हे ही वाचा:
Mulund येथील साऊथ इंडीयन स्टाईलचे अप्पम | South Indian Style Uppam | Food
यंदा आपल्या लाडक्या बाप्पासाठी बनवा मुगाच्या डाळीचे चविष्ट मोदक