Thursday, April 25, 2024

Latest Posts

Fruit Food Custard बनवा अगदी सोप्या पद्धतीने!

कडकत्या उन्हाळ्यात आपल्याला सतत काही तरी थंड खावेसे वाटते. आईस्क्रीम, शीतपेय, कोल्डड्रिंक्स, सरबत अशा विविध थंड पदार्थांवर आपण उन्हाळ्यात ताव मारतो. अनेकांना जेवण नंतर गोड तसेच डेझर्ट खाण्याची सवय असते.

कडकत्या उन्हाळ्यात आपल्याला सतत काही तरी थंड खावेसे वाटते. आईस्क्रीम, शीतपेय, कोल्डड्रिंक्स, सरबत अशा विविध थंड पदार्थांवर आपण उन्हाळ्यात ताव मारतो. अनेकांना जेवण नंतर गोड तसेच डेझर्ट खाण्याची सवय असते. भारतात डेझर्ट या प्रकारात सर्वात लोकप्रिय पदार्थ म्हणजे फ्रुट कस्टर्ड. विविध फळांचे लहान लहान तुकडे थंड दुधात घालून हा पदार्थ तयार केला जातो. फ्रुट कस्टर्ड आपल्या शरीरासाठी अत्यतं पौष्टिक असते तसेच चवीला ही हे फ्रुट कस्टर्ड डेझर्ट अगदी छान असते. फ्रुट कस्टर्ड हा झटपट तयार होणारा पदार्थ आहे. हे फ्रुट कस्टर्ड डेझर्ट बनवायला सुद्धा अगदी सोपे आहे. उन्हळ्यात आपल्याला सारखी काही तरी थंड खाण्याची इच्छा होते, त्यासाठी फ्रुट कस्टर्ड हा उत्तम पर्याय आहे.परंतु आपण कुल्फी, आईस्क्रीम, शीतपेय, सरबत असे वेगवेगळे थंड पदार्थ खाणे पसंत करतो. या मुळे कधी कधी आपली प्रकृती बिघडते. अति उष्णतेमुळे उन्हाळ्यात आपला जीव कासावीस होतो. अशा वेळेस फ्रुट कस्टर्ड खाणे हे सोयीस्कर ठरते. चला तर मग घरच्या घरी झटपट, गोड आणि गारेगार फ्रुट कस्टर्ड कसे बनवावे हे पाहुयात.

Fruit Food Custard बनवण्यासाठी लागणारे साहित्य –

कस्टर्ड पावडर – ४ टेबलस्पून
दूध – १/२ ग्लास
साखर – १/२ कप
सफरचंद – १ कप (बारीक तुकडे करुन घेतलेले)
हिरवी द्राक्षे – १/२ कप (बारीक तुकडे करुन घेतलेले)
चिकू – १/२ कप (बारीक तुकडे करुन घेतलेले)
केळी – १/२ कप (बारीक कप करुन घेतलेले)
काळी द्राक्षे – १/२ कप (बारीक तुकडे करुन घेतलेले)
डाळिंबाचे दाणे – १/२ कप

Fruit Food Custard करण्यासाठीची कृती –

सर्वप्रथम एका मोठ्या बाऊलमध्ये कस्टर्ड पावडर घेऊन त्यात दूध घालावे व दूध आणि कस्टर्ड पावडर चांगले एकत्र मिसळून घ्यावे. आता हे मिश्रण बनवून बाजूला ठेवून द्यावे. आता एका भांड्यात दूध घेऊन व्यवस्थित उकळवून घ्यावे. दूध व्यवस्थित उकळवून झाल्यावर त्यात साखर आणि कस्टर्ड पावडरचे तयार करुन घेतलेले मिश्रण ओतून घ्यावे. या दुधात साखर आणि कस्टर्ड पावडरचे मिश्रण दोन्ही व्यवस्थित मिक्स करून घ्यावे. दुधाचे हे मिश्रण सुमारे १० ते १५ मिनिटे मंद आचेवर हलके गरम करून घ्यावे. तयार झालेले हे मिश्रण नंतर एका वेगळ्या बाऊलमध्ये थंड होण्यासाठी काढून घ्यावे. हे मिश्रण पूर्णपणे गार झाल्यानंतर त्यात आपल्या आवडीनुसार सगळ्या फळांचे काप किंवा लहान तुकडे घालावेत. आता हे तयार झालेले कस्टर्ड थंड होण्यासाठी फ्रिजमध्ये २ ते ३ तासांसाठी ठेवून द्यावे. अशा प्रकारे उन्हाळ्यात थंड राहण्यासाठी झटपट गोड फ्रूट कस्टर्ड तयार आहे.

हे ही वाचा:

संजय शिरसाट यांना पोलिसांकडून दिलासा

Gautami Patil चा कार्यक्रमाचे आयोजन करणे पडले महागात…

South Actor Harish Pengan यांनी वयाच्या ४९ वर्षी घेतला अखेरचा श्वास

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss