लसणाची चटणी : चटणी हा भारतीय आहारातला अविभाज्य भाग आहे. लसूण हा फक्त भाजीची चवच वाढवत नाही तर लसणाची चटणीदेखील जेवणाची चव पूर्णपणे बदलून टाकते. अनेकांचे जेवण चटणीशिवाय पूर्ण होत नाही. तसेच चटणी हे जेवणाची चव दुप्पट करते. सहसा टोमॅटो, शेंगदाणे, हिरव्या मिरचीची चटणी बनवली जाते. पण तुम्ही कधी राजस्थानची प्रसिद्ध लसूण चटणी खाल्ली आहे का? तिखट मिरची आणि लसूण घालून बनवलेली ही चटणी खूपच चविष्ट लागते. या व्यतिरिक्त ही चटणी हिवाळ्यामध्ये फायदेशीर आहे. ही चटणी राजस्थानशिवाय आता देशाच्या इतर भागातही खाल्ली जाते. तसेच रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठीही ही लसणाची चटणी मदत करते. ही चटणी अगदी सोप्या पद्धतीने बनवता येते. लसणाची चटणी अनेक प्रकारे बनवली जाते. पण जर तुम्हाला राजस्थानी चविष्ट चटणी खायची असले, तर चला पाहूया सोप्या पद्धतीने लसणाची चटणी कशी बनवता येते.
चटणीसाठी लागणारे साहित्य :
१) लसूण पाकळ्या १० ते १२
२) सुक्या लाल मिरच्या ४ ते ५
३) मध्यम आकाराचा चिरलेला टोमॅटो १
४) जिरे १ चमचा
५) बारीक चिरलेली कोथींबीर
६) तेल २ ते ३ चमचे
७) मीठ चवीनुसार
८) लाल तिखट दीड चमचा
९) लिंबाचा रस १ टीस्पून
कृती : सर्व प्रथम लसणाच्या पाकळ्या सोलून घ्या. नंतर कोरड्या लाल मिरच्या गरम पाण्यात १० ते १५ मिनिटे भिजून घ्यावे भिजवल्यानंतर ते मऊ होतील. एक कढई घेऊन ती गॅसवर मंद आचेवर ठेवा. यामध्ये जिरे आणि धने घालून छान सुगंध येईपर्यंत परतून घ्या. परतून झाल्याववर थंड होऊ द्या. यानंतर भाजलेले धने आणि जिरे यांची मिक्सरमध्ये छान बारीक पावडर करा. आता कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये लसूण पाकळ्या टाका आणि लसूण पाकळ्या सोनेरी रंगाच्या होईपर्यंत परतून घ्या. यानंतर भिजवलेल्या लाल मिरच्या आणि चिरलेला टोमॅटो त्यात घाला. टोमॅटो पूर्ण मऊ होईपर्यंत आणि तेल वेगळे होईपर्यंत शिजवा. ते वेगळे झाले की त्यात भाजलेले जिरे आणि धने पूड, चवीनुसार मीठ, तिखट घाला. सर्व साहित्य एकजीव करून घ्या. हे मिश्रण एकजीव झाल्यावर १ ते २ मिनिटे शिजवा. आता हे मिश्रण थंड होऊ द्या नंतर मिक्सरमध्ये याला घट्ट वाटून घ्या. त्यामध्ये आवश्यक असेल तर पाणी किंवा तेल घालू शकता. आता अश्या प्रकारे तयार आहे राजस्थानी लसूण चटणी. ही चटणी चपाती, पराठा, भाकरी किंवा पकोडासोबत ही चटणी सर्व्ह करा.
हे ही वाचा:
अजित पवारांकडून बारामती मतदारसंघासाठी जाहीरनामा सादर