Saturday, June 3, 2023

Latest Posts

बनवा घरगुती उपमा प्रिमिक्स ; प्रवासातही मोलाची साथ

उपमा हा साऊथ इंडियन (South Indian ) पदार्थ आहे. पण याची ख्याती भारतभर पसरली आहे. आपल्या घरी उपमा नेहमी नाश्त्यासाठी केला जातो. उपमा हा अगदी कमी वेळात नसतंच बेत आखत बनवण्यासाठीचा पदार्थ आहे . आणि उपमा हा प्रत्येकालाच आवडतो.

उपमा हा साऊथ इंडियन (South Indian ) पदार्थ आहे. पण याची ख्याती भारतभर पसरली आहे. आपल्या घरी उपमा नेहमी नाश्त्यासाठी केला जातो. उपमा हा अगदी कमी वेळात नसतंच बेत आखत बनवण्यासाठीचा पदार्थ आहे . आणि उपमा हा प्रत्येकालाच आवडतो. घरोघरी बनत असलेल्या उपम्यालाही कमी साहित्य लागते. त्यामुळे उपमा हा एक असा पदार्थ आहे जो कमी वेळात त्याचबरोबर कमी साहित्यात बनतो. बहुतांश लोक सकाळच्या नाश्त्याला उपमा खाण्यास पसंती देतात. उपमा हा पदार्थ खूप पौष्टीक आहे. तसेच बरेच लोक सकाळी हलका नाश्ता करण्यास पसंती देतात. उपमा हा पचनास हलका असतो. हलक्याफुलक्या पदार्थांमध्ये उपमा या पदार्थाची गणना केली जाते. पचनासाठी फायदेशीर असणारा उपमा हा आरोग्यासाठी लाभदायक आहे. उपमा बनण्यासाठी अगदी काहीसा वेळ लागतो. आपण पाहुणे आल्यावरही त्यांच्या साठी खास उपमा बनवतो. प्रवासाच्या वेळी आपल्याला कडाक्याची भूक लागते. प्रवास करताना बाहेरचे पदार्थ खाणे हे योग्य नाही. आणि त्यात आपण बाहेरचे तेलकट व पचनास जड असलेले पदार्थ खाल्ले तर आपल्याला प्रवासात उलटीचा व जुलाबाच्या त्रास होऊ शकतो. पण बरेचदा हा त्रास टाळण्यासाठी काही लोक हे घरूनच प्रवासात खाण्यासाठी काही वस्तू नेतात. पण अनेकवेळा आपल्याला प्रश्न पडतो कि प्रवासात खाण्यासाठी काय न्यायचे. पण त्याची चिंता आता तुम्ही करू नका. कारण आज आम्ही अशी एक रेसिपी तुम्हाला सांगणार आहोत कि तुम्ही घरीच बनवून प्रवासात खायला नेऊ शकता. अश्या रेसिपी चे नाव आहे उपमा प्रिमिक्स . उपमा प्रिमिक्स बनवून तुम्ही त्यात कधी गरम पाणी टाकून झटपट उपमा बनवू शकता. चला तर मग जाणून घेऊया कि हे परिमिक्स बनते तरी कसे.

उपमा प्रिमिक्स बनविण्यासाठी लागणारे साहित्य :

४ चमचे तेल, २ चमचे पांढरी उडीत डाळ, २ चमचे शेंगदाणे, काजूच्या १० पाकळ्या, भाजलेली चणा डाळ २ चमचे, जिरे १ चमचा, मोहरी प्रत्येकी १ चमचा, किसलेले आलं १ चमचा, कढीपत्याची ८ ते १० पानं , भिजलेला बारीक रवा ३ कप, चवीनुसार मीठ , साखर १ चमचा, कांदा ३

उपमा प्रिमिक्स बनविण्याची कृती:

उपमा प्रिमिक्स बनविण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही तुमच्याकडे असलेला एक पॅन घ्या, गॅस पेटवून तो पॅन गॅस वर ठेवा. त्या गॅस मध्ये बारीक रवा कोरडा भाजून घ्या. त्यानंतर तुमच्याकडील कढई घ्या त्यामध्ये तेल टाकून घ्या. तेल टाकल्यावर त्यामध्ये पांढरी उदित डाळ, शेंगदाणे, काजू, व भाजून घेतलेली चणा डाळ घालून ते तेलात चांगल्याप्रकारे खमंग परतून घ्या. नंतर त्यात जिरे, मोहरी, हिरव्या मिरच्या, तसेच किसलेले आलं आणि कढीपत्ता घालून घ्या. फोडणी दिल्यानंतर त्यामध्ये सुरवातीला भाजून घेतलेला रवा घालून चांगल्याप्रकारे मिक्स करा. नंतर तुमच्या चवीनुसार मीठ आणि साखर घाला अश्या प्रकारे तुमचे उपमा प्रिमिक्स तयार होईल. उपमा प्रिमिक्स तयार झाल्यावर एका काचेच्या बरणीत स्टोर (store ) करून ठेवा. आणि कधी तुम्हाला उपमा खायची इच्छा झाली तर बनवलेल्या प्रिमिक्स मध्ये गरम पाणी ओतणे. आणि झटपट बनवलेल्या उपम्याचा मनसोक्त आनंद लूटा.

या लेखात नमूद केलेल्या पद्धती आणि सूचनांचे अनुसरण करण्यापूर्वी, डॉक्टर किंवा संबंधित तज्ञाचा सल्ला घ्या.

हे ही वाचा : 

शुभमन गिलच्या नव्या चित्रपटाचा ट्रेलर लाँच

बापट यांच्या निधनानंतर त्यांच्या घराण्यातून कोण करणार पोटनिवडणुकीत एंट्री

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss