Friday, March 29, 2024

Latest Posts

हॉटेल स्टाईल Crispy Chili Chicken बनवा घरच्या घरी…

लहान मोठ्यांपासून प्रत्येकाला चिकन खायला प्रचंड आवडते. चिकन प्रत्येकाचाच आवडीचा पदार्थ आहे. हॉटेलमधील चिकन पदार्थांची बातच काही वेगळी असते.

लहान मोठ्यांपासून प्रत्येकाला चिकन खायला प्रचंड आवडते. चिकन प्रत्येकाचाच आवडीचा पदार्थ आहे. हॉटेलमधील चिकन पदार्थांची बातच काही वेगळी असते. हॉटेलसारख्या चिकन तंदुरी, चिकन लॉलीपॉप व चिकन क्रिस्पी या सारखे कुरकुरीत व चमचमित पदार्थ खाण्याचा मोह प्रत्येकालाच होतो. परंतु सारखे सारखे हॉटेल्स मधले खाणे खिशाला परवडत नाही. म्हणूनच आज आम्ही हॉटेल स्टाईलने क्रिस्पी चिली चिकन घरच्या घरी बनवण्याची रेसिपी खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

चिकन हा प्रोटिनचा उत्तम सोर्स आहे. त्यामुळे ते खाणं आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. हॉटेल्स सारखे चिकन चे पदार्थ घरच्याघरी तयार करून खाणे हे आपल्या आरोग्यासाठी देखील चांगले असते. घरच्या जेवणामुळे कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम आपल्या वर होत नाही. चाल तर मग जाणून घेऊयात घरच्या घरी हॉटेल स्टाईल ने क्रिस्पी चिली चिकन बनवण्याची रेसिपी.

क्रिस्पी चिली चिकन बनवण्यासाठी लागणारे साहित्य –

बोनलेस चिकन २५० ग्रॅम
आलं-लसूण पेस्ट १ चमचा
मिरपूड १/२ चमचा
मीठ चवीनुसार
लाल तिखट १ ते १/२ चमचा
लिंबाचा रस
अंड्याचा पांढरा बलक
कॉर्न फ्लोअर २-३ चमचे
मैदा २-३ चमचे
तळण्यासाठी तेल
तेल १ चमचा
बारीक चिरलेलं आलं
बारीक चिरलेली लसूण
कांद्याचे मोठे चौकोनी तुकडे
ढोबळी मिरचीचे मोठे चौकोनी तुकडे
सोया सॉस १ चमचा
चिली सॉस १ चमचा
टोमॅटो सॉस १ चमचा
कॉर्न फ्लोअर १ चमचा
पाणी
हिरव्या मिरच्यांचे तुकडे
चिरलेली कांद्याची पात

क्रिस्पी चिली चिकन बनवण्याची कृती –

सर्वप्रथम चिकनचे छोटे तुकडे करुन त्यात आलं-लसूण पेस्ट, मिरपूड, मीठ, लाल मिरची पावडर आणि लिंबाचा रस घालावा.सर्व मिश्रण व्यवस्थितपणे एकजीव मिसळावे. पुढे त्यामध्ये अंड्याच्या पांढरा भाग- बलक (एग व्हाईट) टाकून त्यात कॉर्न फ्लोअर, मैदा घालून ते मिश्रण पुन्हा एकदा नीट मिसळून घ्यावे.

आता गॅसवर कढई ठेवून गॅस सुरु करून. कढईमध्ये तेल टाकावे. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये चिकनचे तुकडे घालावे.कढईतले चिकन मध्यम आचेवर किमान ३-४ मिनिटांसाठी तळून घ्यावे. त्यानंतर ते कढईतून बाहेर काढून जास्तीचे तेल काढून टाकावे.

दुसऱ्या कढईमध्ये तेल गरम करुन त्यात लसूण टाकून ३० सेकंदासाठी परतून घावे. नंतर त्यामध्ये कांदा, ढोबळी मिरची टाकून ते साधारण १ मिनिटांसाठी शिजवावे. पुढे गॅस मंद आचेवर ठेवून कढईत सोया सॉस, चिली सॉस, टोमॅटो सॉस घालून ते मिश्रण नीट मिक्स करावे.

एका भांड्यात कॉर्न फ्लोअर आणि पाणी टाकून स्लरी तयार करावी. ही स्लरी कढईतील मिश्रणात घालावी.त्यात पुन्हा थोडस पाणी टाकावे. सोबतीला हिरवी मिरचीही घालावी. तयार झालेल्या सॉसमध्ये तळलेले चिकन घालून व्यवस्थितपणे फेटून घावे. अशा प्रकारे क्रिस्पी चिली चिकन कुरकुरीत व चमचमित तयार होईल.

हे ही वाचा : 

सीईटी परीक्षांचे निकाल जाहीर, प्रवेश फेरीचे वेळापत्रक होणार लवकरच जाहीर

‘या’ तारखेला जाहीर होणार HSC निकाल, जाणून घ्या कसा बघता येईल निकाल

अत्याचाराच्या सर्वाधिक तक्रारी ठाणे जिल्यातून

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss