Wednesday, June 7, 2023

Latest Posts

कमीत कमी तेलात बनवा झटपट कांदा भजी

लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकालाच चमचमीत भजी खायला आवडतात. कोणाला कांदा भजी आवडतात तर कोणाला बटाट्याची भजी आवडतात. काही जण मूग डाळीची भजी अतिशय आवडीने खातत.

लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकालाच चमचमीत भजी खायला आवडतात. कोणाला कांदा भजी आवडतात तर कोणाला बटाट्याची भजी आवडतात. काही जण मूग डाळीची भजी अतिशय आवडीने खातत. गरमा गरम, कुरकुरीत, खमंग भजी पाहीली कि कोणाच्या ही तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. पावसाळ्यात तर गरमागरम भजी आणि गरमागरम चहा यासारखं स्वर्गसुख दुसरे काही नाही. पण बऱ्याचदा तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो अशावेळी आपल्याला काहीतरी वेगळं चटपटीत खाण्याचा मोह होतो. अशा परिस्थितीत आपण भजी सारखा सगळ्यांना आवडणारा पदार्थ घरी देखील बनवून खातो.

भजी जेवढी प्रत्येकाला खायला आवडतात पण कधी कधी भरपूर तेलामुळे ती खाउशी नाही वाटत. भजी म्हंटले की त्यात थोडे तेल असणारच. परंतु जर भजी कमी तेलात बनून तयार झाले तर आपल्याला हवे तेवढे मनसोक्त खाता येतील. आपण सहसा संध्याकाळच्या नाश्त्याला चहासोबत खायला म्हणून कांदाभजी बनवतो. या रोजच्या कांदाभजीला थोडा वेगळा टच देत कमी तेलात देखील आपण तितक्याच खमंग, खुसखुशीत कांदा भजी बनवू शकतो. चला तर मग पाहुयात कमी तेलात कश्या प्रकारे बनवता येतील चमचमीत भजी.

चमचमीत भजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य :-

१. कांद्याची पात – १ कप (बारीक चिरुन घेतलेली)
२. कांदा – १ कप (बारीक चिरलेला)
३. कोथिंबीर – १ कप (बारीक चिरलेली)
४. बेसन – १/३ कप
५. तांदुळाचे पीठ – ३ टेबलस्पून
६. बेकिंग पावडर – १/२ टेबलस्पून
७. कॉर्नफ्लॉवर – १ टेबलस्पून
८. मीठ – चवीनुसार
९. हळद – १/२ टेबलस्पून
१०. जिरे पूड – १ टेबलस्पून
११. लाल तिखट मसाला – १ टेबलस्पून
१२. पांढरे तीळ – १.५ टेबलस्पून
१३. ओवा – १/२ टेबलस्पून
१४. लसूण पाकळ्या – ३ ते ४ (बारीक किसून घेतलेल्या)
१५. तेल – ५ ते ६ टेबलस्पून
१६. पाणी – १/४ कप

चमचमीत भजी बनवण्याची कृती :-

१. सर्वप्रथम एका मोठ्या बाऊलमध्ये, कांद्याची पात, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, बेसन, तांदुळाचे पीठ, कॉर्नफ्लॉवर, बेकिंग पावडर घालून घ्यावी.
२. त्यानंतर या मिश्रणात चवीनुसार मीठ, हळद, जिरे पूड, लाल तिखट मसाला, पांढरे तीळ, ओवा, किसून घेतलेल्या लसूण पाकळ्या व पाणी घालून थोडे घट्टसर पीठ भिजवून घ्यावे.
३. आता एक पॅन घेऊन त्याला थोडेसे तेल लावून घ्यावे, तेल लावल्यानंतर हे भजीचे तयार बॅटर चमच्याने गोलाकार आकारात डोश्यासारखे पसरवून घ्यावे.
४. त्यानंतर या भाज्या तेलावर दोन्ही बाजुंनी खरपूस भाजून घ्याव्यात.

अश्या प्रकारे चमचमीत तव्यातले भजी खाण्यासाठी तयार…

हे ही वाचा : 

Doormat कसे करायचे Clean :

महाराष्ट्रीयन मुलीने परदेशात केले मोठे नाव

शुभमन गिलच्या नव्या चित्रपटाचा ट्रेलर लाँच

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss