आपल्या रोजच्या जेवणात भात हा प्रमुख पदार्थ असतो. बरेच जणांना भात हा लागतोच, भात नसेल तर जेवण त्यांना जेवल्यासारखं वाटत नाही आणि जेवण अपूर्ण केलंय असं वाटते. भाताचे अनेक पदार्थ तयार केले जातात. पुलाव, बिर्याणी, फ्राईड राईस आणि खिचडी हे असे अनेक पदार्थ लोक आवडीने खाल्ले जातात. काहींना फक्त साधा भात आणि वरण देखील आवडीने खायला आवडते. हे सर्व प्रकार तुम्ही रोज रोज खाऊन कंटाळले असाल आणि आता जर तुम्हाला काही तरी वेगळे खायचे इच्छा झाली असेल, तर तुमच्यासाठी आम्ही आज टोमॅटो राईस कसा बनवायचा हे सांगणार आहोत. हा टोमॅटो राईस तुम्ही आपल्या घरात अगदी सहज मिळणाऱ्या साहित्यांपासून बनवू शकता.
टोमॅटो राईस बनवण्यासाठी लागणारे साहित्य –
- तांदूळ
- टोमॅटो
- तेल
- वेलची
- दालचिनी
- बडीशेप
- लवंग
- जिरे
- काजू
- भिजवलेली चणा डाळ
- लसूण
- कांदा
- मीठ
- लाल तिखट
- धणे पूड
- गरम मसाला
- बिर्याणी मसाला
- पाणी
- तूप
- कोथिंबीर
कृती –
सर्वप्रथम कुकरमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा त्यामध्ये खडा गरम मसाला, जिरे, काजू, भिजवलेली चणा डाळ आणि बारीक चिरलेला लसूण घालून मिश्रण चांगले मिक्स करा. मिश्रण मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टॉमेटो घालून सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्या. मिश्रण चांगले मिक्स झाल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ, लाल तिखट, धणे पूड, गरम मसाला, बिर्याणी मसाला आणि ४ मिरच्या घालून ते मिश्रण मिक्स करा. मिश्रण चांगले मिक्स झाल्यानंतर त्याच्यावर ५ मिनिटे झाकण ठेवा. त्यानंतर एक कप धुवून घेतलेले तांदूळ घालून संपूर्ण साहित्य एकत्र मिक्स करा. आता त्यामध्ये २ कप पाणी, बारीक चिरलेली कोथिंबीर, एक चमचा तूप घालून मिक्स करा आणि त्यावर कुकरचं झाकण लावून २ शिट्टी होईपर्यंत भात शिजवून घ्या. कुकर थोडं थंड झाल्यानंतर कुकरचं झाकण उघडा. बाऊलमध्ये गरमागरम टॉमेटो राइस सर्व्ह करा. अशा प्रकारे आंबट तिखट चवीचा हटके असणारे टॉमेटो राइस खाण्यासाठी तयार.
हे ही वाचा :
युनेस्कोला बारसूमध्ये कातळ शिल्प सापडली
राज ठाकरेंनी केली मुंबई -गोवा महामार्गाची समृद्धी महामार्गासोबत तुलना
Raj Thackeray यांचा शरद पवरांवर निशाणा, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शरद पवार घेत नाहीत