Thursday, April 18, 2024

Latest Posts

बनवा घरच्या घरीच ‘फणसाची पोळी’… जाणून घ्या स्पेशिअल रेसिपी

उन्हाळ्यात आपण मनोसक्त आंबे खातो. पण आता आंब्यानंतर सर्वत्र फणसाचा घमघमाट पसरतो. फणस देखील सर्वांच्या आवडीचे फळ. या बाहेरून टोकेरी आणि आतून मधुर असलेल्या फणसावर सगळेच लोक ताव मारतात. फणसामध्ये देखील दोन जाती आहेत एक म्हणजे कापा फणस आणि दुसरा म्हणजे बरका फणस.

उन्हाळ्यात आपण मनोसक्त आंबे खातो. पण आता आंब्यानंतर सर्वत्र फणसाचा घमघमाट पसरतो. फणस देखील सर्वांच्या आवडीचे फळ. या बाहेरून टोकेरी आणि आतून मधुर असलेल्या फणसावर सगळेच लोक ताव मारतात. फणसामध्ये देखील दोन जाती आहेत एक म्हणजे कापा फणस आणि दुसरा म्हणजे बरका फणस. बरक्या फणसात जास्त रसाळ फणसाचे गरे असतात. काही जणांना कापा तर काहींना बरका फणस आवडतो. कोकणात फणसाचे अनेक पदार्थ बनवले जातात. जितका फणस खाण्यास मधुर लागतो तितकेच त्याचे पदार्थ देखील खाण्यास मजेशीर लागतात. अश्या या चविष्ट फणसाचे पदार्थ हे आरोहयासाठी लाभदायक असतात. फणसाचे पदार्थ हे खूप लोकप्रिय आहेत. बाजारात तर फणसापासून बनणारे पदार्थ हे अनेकवेळा चाखायला मिळतात. पण आपण हे फणसाचे पदार्थ घरी देखील बनवू शकतो. तसेच फणसमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. फणसापासून आपल्या शरीराला अनेक फायदेशीर पोषक घटक मिळतात. तुम्ही आतापर्यंत फणसाची गरे खलले असतीलच , फणसाच्या भाजलेल्या बिया खाल्ल्या असतीलच पण तुम्ही कधी फणसाची पोळी खाल्ली आहे का? हि फणसाची पोळी खाण्यास अतिशय चविष्ट लागते. आणि खूप पौष्टिक असते. ही पोळी तुम्ही जेवणासाठी बनवू शकता तसेच कोणत्याही सणावाराला बनवू शकता. चला तर मग शिकून घेऊया फणसाची पोळी कशी बनवावी.

फणसाची पोळी बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

मध्यम आकाराचा फणस, (फणस हा बरका या जातीतला)
१ कप साखर
१ ताट
थोडेसे ताटाला लावण्यापुरती तूप

फणसाची पोळी बनवण्यासाठीची कृती:

फणसाची पोळी बनविण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही तुमच्या हाताला फणसाचा चीक लागू नये म्हणून हाताला तेल लावून फणस कापून घ्या. आणि त्यातला गर काढून त्याच्या बिया वेगळ्या करून ठेवा. त्यांनतर फणसाचे गर मिक्सरच्या भांड्यात घेऊन बारीक करून घ्या. त्यानंतर तुमच्याकडे असलेले मोठे भांडे घ्या आणि त्यात बारीक केलेले गर टाकून घ्या. त्यांनतर गॅसवर ठेवून चांगल्याप्रकारे ढवळत रहा . त्यामध्ये साखर घालून घ्या आणि चांगल्याप्रकारे मिक्स करून घ्या. त्यानंतर ७ ते ८ मिनिटांसाठी गॅस मंद आचरेवर ठेवून चांगले शिजवून घ्या. काही वेळात त्याचा रंग व घनता यांमध्ये बदल दिसून येईल. त्यानंतर काही तुमच्याकडे असलेल्या मोठ्या ताटांना तूप लावा आणि त्या तूप लावलेल्या ताटांना पळीने मिश्रण पसरवून ठेवा. तुम्ही ते मिश्रण तटावर व्यवस्थित पणे पसरवा अगदी जाड नको तर अगदी बारीक नको. आणि त्यानंतर ते उन्हात वाळवत ठेवा. अश्या प्रकारे तुमची फणसाची पोळी तयार होईल. ती तुम्ही वर्षभर खाऊन त्याचा आस्वाद घेऊ शकता.

या लेखात नमूद केलेल्या पद्धती आणि सूचनांचे अनुसरण करण्यापूर्वी, डॉक्टर किंवा संबंधित तज्ञाचा सल्ला घ्या.

हे ही वाचा : 

दुपारची झोप येतेय? हे उपाय नक्की ट्राय करा | Tired | Lifestyle | Power Nap

बनवा आरोग्यासाठी लाभदायक नाचणीचा केक; मधुमेह असलेल्यानाही खाता येईल

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss