Friday, April 19, 2024

Latest Posts

अशाप्रकारे बनवा कैरीची आंबट गोड चटणी; जाणून घ्या संपूर्ण रेसिपि

कैरीचे नाव काढताच प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटते. आंबट गोड असलेली ही कैरी आपल्यासर्वांचीच आवडती असते. कैरीवर मिठी मसाला लावून खाण्याची एक वेगळीच गंमत असते. अश्या या आंबट गोड कैरीपासून वेगवेगळे पदार्थ बनविले जातात.

कैरीचे नाव काढताच प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटते. आंबट गोड असलेली ही कैरी आपल्यासर्वांचीच आवडती असते. कैरीवर मिठी मसाला लावून खाण्याची एक वेगळीच गंमत असते. अश्या या आंबट गोड कैरीपासून वेगवेगळे पदार्थ बनविले जातात. कैरीचे पन्हे त्याचबरोबर कैरीचे आईस्क्रीम (Ice cream) देखील लहानमुलांपासून ते मोठ्यामाणसांपर्यंत सर्वांच्या आवडीचे असते. आपल्या भारतीय खाद्यसंस्कृतीतही कैरीचा वापर केला जातो. काही वेळेस रोजच्या स्वयंपाकात देखील आंबट गोड चव येण्यासाठी कैरीचा वापर केला जातो. याचबरोबर तुम्हाला माहित आहे का कैरी खाण्याचे आपल्या आरोग्यासाठी देखील अनेक फायदे आहेत. उष्मघातापासून बचाव करण्यासाठी कैरीचे सेवन करणे आवश्यक आहे. त्याशिवाय कैरीचे सेवन केल्याने आपल्या शरीरातील हाडे देखील मजबूत होतात त्याचेकारण म्हणजे कैरीमध्ये कॅल्शिअम (Calcium) चे योग्य प्रमाण असते. तुम्ही आजपर्यंत कैरीपासून अनेक पदार्थ बनविले असतील पण तुम्ही कधी कैरीच्या चटणी बद्दल ऐकले आहे का? आज आम्ही तुम्हाला कैरीची चटणी कशी बनवायची याबद्दल सांगणार आहोत.

कैरीची चटणी बनविण्यासाठी लागणारे साहित्य:

अगदी थोडक्या प्रमाणात आंबट असलेल्या कैरीचा किस १/२ वाटी
सुख्या खोबऱ्याचा किस १/२ वाटी
गुळ ३ चमचे
जिरे २ चमचे
लाल तिखट २ चमचे
कोथिंबीर
चवीनुसार मीठ

कैरीची चटणी बनविण्यासाठीची कृती:

कैरीची चटणी बनविण्यासाठी सर्वप्रथम मिक्सरचे भांडे घ्या त्यामध्ये मीठ, तिखट, आणि जिरे घालून त्याला व्यवस्थित बारीक करून घ्या. त्यामध्ये कैरीचा किस आणि त्याचबरोबर सुख्या खोबऱ्याचा किस घालून चटणी वाटून घ्यावी. त्यात कोथिंबीर घालून पुन्हा एकदा मिक्सर फिरवावे. त्यानंतर तुमच्याकडे असलेली एक कढई घेऊन त्यात दोन चमचे तेल घालून गरम करत ठेवावे. त्यामध्ये जिरे आणि हिंग घालून फोडणी द्यावी. फोडणी थंड झाल्यावर चटणीवर घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यावी. अश्याप्रकारे तुमची कैरीची चटणी तयार होईल. तुमच्या दैनंदिन आहारात तुम्ही कैरीची चटणी खाऊ शकता.

हे ही वाचा : 

श्रीकांत शिंदे यांनी कल्याण डोंबिवली मतदारसंघावरून दिली प्रतिक्रिया

औरंगजेबाचं नाव घेणाऱ्यांवर फडणवीस भडकले

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss