spot_img
Thursday, December 5, 2024
spot_img

Latest Posts

सकाळच्या नाश्त्याला बनवा मुळा पराठा रेसिपी, जाणून घ्या सोपी पद्धत

बटाटा पराठा, कोबी पराठा, पालक, मेथी पराठा आणि मुळा पराठा खायला खूप चविष्ट लागतात. मुळ्याचे पराठे हे अत्यंत चविष्ट व आरोग्यदायक असतात. हे पराठे बनवायला सोपे असतात.

हिवाळ्यामध्ये सकाळी गरमागरम नाश्ता करायची इच्छा होते. गुलाबी थंडीत पराठे खायला आवडतात. हिवाळ्यात अनेक प्रकारचे पराठे बनवले जातात. बटाटा पराठा, कोबी पराठा, पालक, मेथी पराठा आणि मुळा पराठा खायला खूप चविष्ट लागतात. मुळ्याचे पराठे हे अत्यंत चविष्ट व आरोग्यदायक असतात. हे पराठे बनवायला सोपे असतात. बहुतेक वेळा मुळा पाणी सोडते आणि त्यामुळे मुळा पराठा कोणीही जास्त करत नाही. आज आपण मुळा पराठा कसा बनवायचा याची सोपी रेसिपी पाहूया.

साहित्य:

गव्हाचे पीठ – २ कप

मीठ – चवीनुसार

तेल – १ चमचा

पाणी – आवश्यकतेनुसार

किसलेला मुळा – १ मध्यम आकाराचा

मुळ्याची पाने (ऐच्छिक) – २-३ चमचे (चिरलेली)

हिरवी मिरची – २ (चिरून)

आले – १/२ इंच (किसून)

जिरे – १/२ चमचा

धने पावडर – १ चमचा

हळद – १/४ चमचा

लाल तिखट – १/२ चमचा

गरम मसाला – १/४ चमचा

मीठ – चवीनुसार

कृती:

  • एका मोठ्या भांड्यात गव्हाचे पीठ, मीठ आणि तेल एकत्र करा.
  • थोडे थोडे पाणी घालून मऊसर पीठ मळा.
  • तयार पीठ झाकून १५-२० मिनिटे बाजूला ठेवा.
  • मुळ्याला किसून, त्यातील पाणी हलकासा पिळून काढा. (हे पाणी नंतर पीठ मळण्यासाठी वापरू शकता.)
  • कढईत थोडे तेल गरम करून त्यात जिरे घाला.
  • त्यात हिरवी मिरची, आले, आणि हळद घालून परता.
  • पिळलेला मुळा, मुळ्याची पाने (जर वापरत असाल), धने पावडर, लाल तिखट, गरम मसाला आणि मीठ घालून परतून घ्या.
  • मिश्रण कोरडे होईपर्यंत शिजवा आणि नंतर थंड होण्यासाठी ठेवून द्या.
  • मळलेल्या पिठाचे लहान लहान गोळे बनवा.
  • प्रत्येक गोळ्याला पुरीसारखे लाटा आणि त्यावर सारण ठेवा.
  • कडा नीट बंद करून पुन्हा हलक्या हाताने पराठा लाटा.
  • तवा गरम करून त्यावर लाटलेला पराठा ठेवा.
  • दोन्ही बाजूंना थोडे तेल लावून खरपूस भाजून घ्या.
  • गरमागरम मुळ्याचे पराठे दही, लोणचं किंवा लोण्यासोबत सर्व्ह करा.

हे ही वाचा:

सर्वसामान्य जनतेचा रोष होता म्हणून यशोमती ठाकूर यांचा पराभव: Rajesh Wankhede

Manoj Jarange यांचा फडणवीसांना इशारा, म्हणाले, “तू पुन्हा आला की…”

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss