Wednesday, April 24, 2024

Latest Posts

घरच्या घरीच बनवा Paneer Crispy अगदी सोप्प्या पद्धतीने

पनीर म्हंटल की प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतं. पनीरचे सर्वच पदार्थ हे चवीला छान लागतात. शिवाय पनीर आहे सुद्धा पौष्टीक. पनीर खाल्याने आपल्याला शरीराला अनेक फायदे मिळतात.

पनीर म्हंटल की प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतं. पनीरचे सर्वच पदार्थ हे चवीला छान लागतात. शिवाय पनीर आहे सुद्धा पौष्टीक. पनीर खाल्याने आपल्याला शरीराला अनेक फायदे मिळतात. पनीरमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शिअम असतात त्याशिवाय प्रोटीन चे प्रमाण देखील जास्त असते. म्हणूनच पनीर खाल्याने आपल्या मांसपेशी आणि आपल्या शहरातील हाडे मजबूत होतात. तसेच पनीर सर्वांच्या आवडीचे खाद्यपदार्थ आहे. लहानमुलांपासून ते मोठ्यामाणसांपर्यंत पनीरचे सर्वच पदार्थ सर्वाना आवडतात. हॉटेल मध्ये गेल्यावरही बहुतांश लोक पनीरलाच पहिली पसंती देतात. लहानमुलांना इतर भाज्या दिल्या की ते नाक मुरडतात पण पनीरची भाजी मिळाली की त्यावर ताव मारतात. आज आम्ही तुम्हाला पनीर क्रिस्पीची (Paneer Crispy) ची रेसिपी सांगणार आहोत. तुम्हाला पनीर क्रिस्पी बद्दल तर माहितीच असेल अथवा तुम्ही हॉटेल मध्ये जाऊन खाल्लीच असेल. पण पनीर क्रिस्पीची रेसिपी तुम्ही घरच्या घरी अगदी सध्या पद्धतीने देखील करू शकता. पनीर क्रिस्पी हा लोकप्रिय पदार्थ असून स्टार्टर्सचा (Starter) प्रकार आहे.

पनीर क्रिस्पी बनविण्यासाठी लागणारे साहित्य:

पनीर २५० ग्रॅम
मैदा १-४ चमचा
कॉर्नफ्लॉवर २ चमचे
काळी मिरी १ चमचा
चवीप्रमाणे मीठ
आलं लसूण पेस्ट १ चमचा
शेजवान सॉस १ चमचा
कांद्याची पात १
चिरलेली लसूण
सोया सॉस १ चमचा
तेल
चिली सॉस १ चमचा
साखर १-२ चमचे
हिरव्या मिरच्या २

पनीर क्रिस्पि बनविण्याची कृती:

पनीर क्रिस्पी बनविण्यासाठी सगळ्यात आधी पनीरचे चौकोनी छोटे छोटे तुकडे कापून घ्या. तुमच्याकडे असलेला एक बाउल घेऊन त्यात आलं लसूण पेस्ट, काळीमिरी, लसूण आणि कॉर्नफ्लॉवर टाका. त्यामध्ये पनीरचे तुकडे टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या.त्यानंतर दुसरा बाउल घेऊन त्यात मैदा, कॉर्नफ्लावर, आणि चवीनुसार मीठ टाकून चांगल्या प्रकारे त्याचे मिश्रण करून घ्या. त्यानंतर तुमच्याकडे असलेली एक कढई घेऊन ती गॅस वर ठवून गॅस पेटवा. त्या कढई मध्ये तेल गरम करत ठेवा. त्यानंतर मिश्रणातील पनीरचे एक एक तुकडे घेऊन तेलात सोडून चांगल्याप्रकारे कुरकुरीत फ्राय (Fry) करून घ्या. त्यानंतर दुसरीकडे एक पॅन घेऊन गॅस पेटवा आणि त्यामध्ये गरम तेल टाका नंतर त्यात हिरवी मिरची,, लसूण, आलं लसूण पेस्ट, शेजवान सॉस टाकून काहीवेळ शिजवून घ्या. त्यानंतर त्यात थोड पाणी, चिली सॉस, काळीमिरी, सोया सॉस आणि किंचित साखर टाकून [पुन्हा काहीवेळ शिजवून घ्या. त्यानंतर या तयार सॉस मध फ्राईड सॉसचे तुकडे टाकून मिक्स करा. अशा प्रकारे तुमची पनीर क्रिस्पी तयार होईल.

Latest Posts

Don't Miss