Wednesday, April 24, 2024

Latest Posts

बनवा मटारांच्या सालींची चमचमीत भाजी अगदी सोप्प्या पद्धतीने…

आपण आपल्या जेवणात नेहमी मटारची भाजी बनवतो. हिरवे मटार आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. हिरव्या मटारची उसळ हि आपण नेहमीच करतो त्याच बरोबर हिरव्या मटारचे आपण अनेक पदार्थ बनवतो. हिरव्या मटाराचा वापर आपण पुलाव मध्ये सुद्धा करतो

आपण आपल्या जेवणात नेहमी मटारची भाजी बनवतो. हिरवे मटार आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. हिरव्या मटारची उसळ हि आपण नेहमीच करतो त्याच बरोबर हिरव्या मटारचे आपण अनेक पदार्थ बनवतो. हिरव्या मटाराचा वापर आपण पुलाव मध्ये सुद्धा करतो. हिरवे वाटणे आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात. हिरच्या वाट्याण्यामध्ये अनेक पौष्टिक घटक असतात. हिरव्या वाटाण्यामधून आपल्याला भरपूर प्रमाणात जीवनसत्वे मिळतात. यामध्ये खनिजे, अँटिऑक्सिडंट यांसारखे गुणधर्म असतात. हिरव्या वाटाण्याचा कोणताही पदार्थ करण्यासाठी आपल्याला आधी हिरवे मटार सालींमधून काढून घ्यावे लागतात त्यानंतर हिरव्या वाटाण्याच्या ज्या साली असतात त्या आपण फेकून देतो. पण तुम्हाला माहित आहे का कि मटारांच्या सालींची सुद्धा भाजी करता येते? होय!तुम्ही अगदी योग्य वाचलं! माताराणीच्या सालींची देखील चमचमीत भाजी बनवता येते. चला तर मग जाणून घेऊया या भाजी ची रेसिपी.

मटारच्या सालींची भाजी करण्यासाठी लागणारी साहित्य

हिरव्या वाटण्याच्या सालीं, बटाटे, तेल, जिरं, कांदा, मीठ, हळद, आलं लसूण पेस्ट, धणे पावडर, टोमॅटो प्युरी, लाल तिखट, गरम मसाला

मटारच्या सालींची भाजी बनविण्यासाठीची कृती:

सर्वप्रथम हिरवे वाटणे सोलून त्या साली स्वच्छ धुवून घ्या. त्यांनतर बटाटा घेऊन त्याचे साल सोलून तो स्वच्छ धुवून घ्या आणि नंतर त्याचे बारीक काप करून घ्या. नंतर गॅस पेटवून त्यावर तुमच्याकडे असलेला नॉन स्टिक (Non Stick) चा तवा घेऊन गॅस वर ठेवा आणि त्यावर तेल टाकून ते गरम करत ठेवून घ्या. त्यामध्ये जिरं आणि कांद्याचे बारीक काप घाला आणि चांगल्याप्रकारे भाजून घ्या. त्यांनतर त्यामध्ये बटाट्याचे काप टाकून हळद, आलं लसूण पेस्ट आणि कॅचविनुसार मीठ टाकून चांगले परतवून घ्या. चांगले मिक्स करून झाल्यावर त्यावर झाकण ठेवून एक वाफ द्या. बटाटे शिजल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो प्युरी टाका आणि तीन ते चार मिनिटे शिजवून घ्या. आणि त्यात नंतर मटारांच्या साली टाकून गरम मसाला, लाल तिखट, धणे पावडर टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या. अशाप्रकारे तुमची मटाराच्या सालींपासून बनवलेली भाजी खाण्यासाठी तयार होईल.

हे ही वाचा:

मनोरंजन क्षेत्रात पुन्हा घडली दुर्दवी घटना…

छगन भुजबळांनी उपस्थित केला एक सवाल ?

तळपत्या उन्हात रिफ्रेशिंग व्हा! करून बघा घरात Mango Mojito

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss