spot_img
spot_img
Tuesday, October 3, 2023
spot_img
spot_img

Latest Posts

कृष्णजन्माष्टमीसाठी बनवा सोप्या पद्धतीमध्ये सुंठवडा

देशात कृष्णजन्माष्टमी मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केली जाते. यादिवशी कृष्णाची पूजा केली जाते. मथुरा आणि देशभरातील कृष्णभक्तांसाठी हा दिवस म्हणजेच श्रावण कृष्ण पक्ष अष्टमी असतो.

देशात कृष्णजन्माष्टमी मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केली जाते. यादिवशी कृष्णाची पूजा केली जाते. मथुरा आणि देशभरातील कृष्णभक्तांसाठी हा दिवस म्हणजेच श्रावण कृष्ण पक्ष अष्टमी असतो. दहीहंडीच्या दिवशी कृष्णाला आवडत्या गोष्टींचा नैवेद्य दाखवला जातो. त्यापैकी एक म्हणजे “सुंठवडा “. सुंठवडा हा कृष्णजन्माष्टमीचा दिवशी खास प्रसाद म्हणून वाटला जातो. यामध्ये असलेले सर्व पदार्थ शरीरासाठी पौष्टिक आणि फायदेशीर असतात. दिवसभराच्या उपवसानंतर हे पदार्थ पोटाला आराम देतात. पण हाच सुंठवडा घरच्या घरी कसा तयार करायचा हे आज आपण पाहणार आहोत.

साहित्य:-
खोबरे १५० ग्रॅम
बदाम ५० ग्रॅम
ग्रॅम काजू ५० ग्रॅम
ग्रॅम खारीक १०० ग्रॅम
सुठ पावडर १ चमचा
बडीशेप १ चमचा
खडीसाखर १०० ग्रॅम
पिस्ता. ५० ग्रॅम

कृती:-
सर्वप्रथम खारीक मधील बिया काढून घ्या. त्यानंतर खोबर किसून घ्या. नंतर एका पॅनमध्ये खोबर भाजून घ्या. खोबर भाजून झाल्यानंतर बडीशेप भाजून घ्या. त्यातच काजू, बदाम आणि पिस्ता व्यवस्थित भाजून घ्या. भाजून झाल्यांनतर ते सर्व थंड करून घ्या. नंतर काजू, बदाम आणि पिस्ता बडीशेप आणि साखर मिक्सर मध्ये बारीक करून घ्या. हे सगळं बारीक करून झाल्यानंतर एका वाटीमध्ये काढून घ्या. वाटीमध्ये काढून झाल्यानंतर सर्व बारीक केलेले साहित्य काजू, बदाम, पिस्ता, खोबरे, साखर मिक्स करून घ्या. मिक्स करून झाल्यांनतर त्यात एक चमचा सुंठ पावडर टाकून पुन्हा मिक्स करा आणि एका मोठ्या वाटीमध्ये काढून त्यावर तुळशीचे पान ठेवून सजवून घ्या. आता गोड आणि स्वादिष्ट सुंठवडा खाण्यासाठी तयार आहे.

हे ही वाचा:

देशाच परिवर्तन करण्यासाठी ही आघाडी मजबूत असणार, शरद पवार

माविआ पत्रकार परिषद LIVE : आम्ही हुकूमशाहीच्या विरोधात , उद्धव ठाकरे

मेटा यूजरसाठी मार्क झुकेबर्गने आणले नवीन फिचर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss