Saturday, April 20, 2024

Latest Posts

बनवा घरच्या घरीच पोहे आणि बटाट्यापासून बनवू खमंग कटलेट

गृहिणींना सर्वात मोठा पडलेला प्रश्न म्हणजे दिवसाच्या सुरवातीला नाश्तासाठी काय बनवायचं. बहुतांश घरी नाश्त्यासाठी कांदापोहे किंवा उपमा केला जातो. कांदापोहे आणि उपमा हे झटपट बनणारे पदार्थ असल्यामुळे ते आपण बनवतो पण हे पदार्थ नाश्त्याला रोज रोज खाऊन अनेकांना कंटाळा येतो.

गृहिणींना सर्वात मोठा पडलेला प्रश्न म्हणजे दिवसाच्या सुरवातीला नाश्तासाठी काय बनवायचं. बहुतांश घरी नाश्त्यासाठी कांदापोहे किंवा उपमा केला जातो. कांदापोहे आणि उपमा हे झटपट बनणारे पदार्थ असल्यामुळे ते आपण बनवतो पण हे पदार्थ नाश्त्याला रोज रोज खाऊन अनेकांना कंटाळा येतो. त्यामुळे लहान मुलं व काही वेळेस मोठेही रोज रोज एकच प्रकारचा नाश्ता करण्यास टाळाटाळ करतात .आहार तज्ज्ञांच्या मते, सकाळच्या नाश्ताला अतिशय महत्व दिले जाते. सकाळचा नाश्ता हा झालाच पाहिजे केला पाहिजे असे तज्ज्ञांचे मत आहे. म्हणजेच काय तर भरपेट नाश्ता हा सकाळी केलाच पाहिजे. पण तुम्हाला माहित आहे का या कांद्यापोह्याला लागणारे सर्व साहित्य वापरून असाच एक पौष्टीक नाश्ता बनवू शकतो. हा नाश्ता तुमच्या मुलांनादेखील खूप आवडेल आणि ते बोट चाखत सगळा नाश्ता संपवतील. या नाष्टातून त्यांना चवीसोबत त्यांच्या शरीरासाठी असलेले योग्य पोषक घटकही मिळतील. या नाश्ताच्या रेसिपीचे नाव आहे पोहे आणि बटाट्यापासून बनलेले कटलेट. चला तर मग पाहूया हे चविष्ट कटलेट बनवायचे तरी कसे.

कुरकुरीत पोहे- बटाट्यांपासून बनलेले कटलेट बनविण्यासाठी लागणारे साहित्य

१ किंवा २ वाटी पोहे, २ उकडलेले बटाटे, १ कांदा, वेगवेगळ्या रंगाच्या शिमला मिरची १ वाटी, आलं- मिरची पेस्ट, लाल तिखट १ चमचा, १ चमचा धणे जिऱ्याची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, १ चमचा चाट मसाला, २ किंवा ३ चमचे तांदळाचे पीठ, २ चमचे दाण्याचा कूट, बारीक चिरलेली कोथिंबीर

कुरकुरीत पोहे- बटाट्यांपासून बनलेले कटलेट बनविण्यासाठीची कृती

पोहे- बटाट्यांपासून बनलेले कटलेट बनविण्यासाठी सर्वप्रथम पोहे भिजवून चांगले एकत्र करून घ्या व त्यामध्ये उकडलेला बटाटा किसून घाला त्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा, शिमला मिरची तसेच आलं मिरची ची पेस्ट घालावी. त्याचबरोबर तिखट, धणे जिऱ्याची पावडर, गरम मसाला, चाट पावडर आणि चवीनुसार मीठ घालून घ्या. नंतर त्यात तांदळाचे पीठ, दाण्याचा कूट आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. हे सर्व घालून झाल्यावर तुम्ही तुमच्या हाताला थोडेसे तेल लावून घ्या. आणि आपण पीठ मळतो तसे हे चांगल्याप्रकारे एकत्रित करून मळून घ्या. मळून झाल्यावर त्याचे छोटे एक सारखे कटलेट करून त्याच्यावर तीळ लावा. तुमच्या कडे असलेली कढई घ्या आणि गॅस पेटवून ती कढई गॅस वर ठेवा. त्यामध्ये तळण्यासाठी तेल ओतून घ्या आणि तयार केलेले कटलेट तेलात टाळून घ्या. तुमचे हे कुरकुरीत पोहे- बटाट्यांपासून बनलेले कटलेट सॉस बरोबर किंवा चटणी सोबत खाऊ शकता.

या लेखात नमूद केलेल्या पद्धती आणि सूचनांचे अनुसरण करण्यापूर्वी, डॉक्टर किंवा संबंधित तज्ञाचा सल्ला घ्या.

हे ही वाचा : 

Instagram Account Hack झालय? घ्या ‘ही’ खबरदारी आणि रहा हॅकर्स पासून सुरक्षित…

बापट यांच्या निधनानंतर त्यांच्या घराण्यातून कोण करणार पोटनिवडणुकीत एंट्री

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss