Friday, March 29, 2024

Latest Posts

पोहे आणि बटाट्यानंपासून बनवा शंकरपाळ्या, चविष्ट आणि बनवायला देखील सोपं !

रोज नाश्त्याला काय बनवावे हा अडचणीचा प्रश्न नेहमी महिलांना पडतो. मग पोहे, उपीट झाले की फोडणीचा भात नाहीतर फोडणीची पोळी ठरलेलीच असते.

रोज नाश्त्याला काय बनवावे हा अडचणीचा प्रश्न नेहमी महिलांना पडतो. मग पोहे, उपीट झाले की फोडणीचा भात नाहीतर फोडणीची पोळी ठरलेलीच असते. परंतु रोज रोज तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो. आणि नाश्त्याला काही तरी वेगळ आणि नवीन खाण्याची प्रचंड इच्छा होते. घरात असलेल्याच पदार्थाने काही तरी नवीन बनवले की सर्व सदस्य आवडीने खातात. लहान मुलांना खाऊच्या डब्ब्यात काही तरी नवीन देण्यासाठी आज आम्ही तुमच्यासाठी एक नवीन आणि रंजक पदार्थ घेऊन आलो आहोत.

दिवाळीत सगळ्यांचा आवडीचा पदार्थ म्हणजे शंकरपाळ्या. प्रत्येक जण शंकरपाळ्या आवडीने खातो. परंतु तुम्ही कधी पोहे आणि बटाट्या पासून बनवलेल्या शंकरपाळ्या खाल्या आहेत का? नसेल खाल्यातर आज हि रेसिपी खास तुमच्यासाठी आहे. पोहे आणि बटाट्या पासून बनवलेल्या या शंकरपाळ्या लहानांपासून ते मोठ्यानंपर्यंत सर्वांनाच आवडतात. या शंकरपाळ्या बनवायला सुद्धा अगदी सोप्या असतात चला तर मग जाणून घेऊयात. या शंकरपाळ्या कश्या तयार केल्या जातात.

साहित्य –

पोहे – १ वाटी
उकडलेले बटाटे – १ वाटी
आलं-लसूण पेस्ट – १ चमचा
जीरं – १ चमचा
ओवा – १ चमचा
चीली फ्लेक्स – अर्धा चमचा
कोथिंबीर – २ चमचे
मीठ – चवीनुसार
तेल – २ वाट्या

कृती –

सर्वप्रथम पोहे स्वच्छ चाळून घ्यावे आणि पोह्यांची मिक्सरवर बारीक पूड करून घावी. नंतर बारीक केलेली ही पूड एका बाऊलमध्ये काढून त्यामध्ये ओवा, जीरं, मीठ आणि चिली फ्लेक्स घालावे. नंतर यात आलं लसूण पेस्ट, उकडून स्मॅश केलेला बटाटा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. नंतर आवश्यकतेनुसार पाणी घालून याचे छान घट्टसर पीठ मळून घ्यावे. तसेच कणकेच्या गोळ्याप्रमाणे गोळा घेऊन त्याच्या पोळ्या लाटाव्या. पोळ्या लाटून झाल्यावर कडेचे भाग काढून टाकावे आणि मध्यभागी असलेले चौकोनी भाग वेगळे ठेवावे. आता हे शंकरपाळ्याच्या आकाराचे चौकोनी भाग तेलात तळून घावे आणि थोडं गार झाले की हे खायला घावे.

Latest Posts

Don't Miss