Tuesday, April 23, 2024

Latest Posts

पावसाळ्यात घरच्या घरी बनवा Special Rainy Garlic Soup!

जून महिना उजाडला आहे. लवकरच पावसाचे आगमन देखील होईल. पावसाळ्यात आपण मस्त गरमागरम भजी आणि गरम चहा यावर ताव मारतो. पावसाळ्यात गरम चहा आणि भजी सेवन केल्यामुळे आपले मन तृप्त होते.

जून महिना उजाडला आहे. लवकरच पावसाचे आगमन देखील होईल. पावसाळ्यात आपण मस्त गरमागरम भजी आणि गरम चहा यावर ताव मारतो. पावसाळ्यात गरम चहा आणि भजी सेवन केल्यामुळे आपले मन तृप्त होते. अनेकजण पावसाळ्यात विविध प्रकारचे पावसाळी पदार्थ बनवून खातात. भाज्यांचे सूप हे पावसाळी पदार्थांमध्ये टॉपला आहे. भाज्यांचे सूप सेवन केल्यामुळे आपले आरोग्य सुद्धा चांगले राहते. यातील पौष्टिक घटक आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात. म्हणूनच आज आम्ही पावसाळ्यात सेवन करण्या साठी खास तुमच्यासाठी Special Rainy Garlic Soup ची रेसिपी घेऊन आलो आहोत.

आपण टोमॅटो सूप, स्वीट कॉर्न सूप, मिक्स्ड व्हेज सूप, कोबी सूप इत्यादी हमखास खातो. परंतु तुम्ही कधी लसूण सूप टेस्ट केले आहे का? लसूण खाणे अनेकांना आवडतं. नेहमीच्या जेवणाला लसनामुळे प्रचंड चव येते. लासनापासून तयार केलेले हे सूप खवय्यांसाठी विशेष मेजवाणी ठरेल. लसूण सूप तयार करण्यासाठी जास्त सामग्री ची आवश्क्यता नसते. व हे सूप चवीला ही अगदी चविष्ट आणि आरोग्यासाठी पौष्टिक असते. भाजलेल्या भाज्या तेसच ब्रेड सोबत आपण हे लसूण सूप सेवन करू शकतो. चला तर मग जाणून घेऊयात Special Rainy Garlic Soup ची स्पेशल रेसिपी.

लसूण सूप बनवण्यासाठी लागणारे साहित्य –

८ पाकळ्या लसूण
१ बटाटा
१/२ टीस्पून जिरे
१ टीस्पून चिली फ्लेक्स
२ टीस्पून व्हर्जिन ऑलिव्ह ऑईल
१ कांदा
१/२ कप फ्रेश क्रीम
१ टीस्पून ओरेगॅनो
मीठ आवश्यकतेनुसार

लसूण सूप बनवण्यासाठी पुढील कृती करावी –

लसूण सूप बनविण्यासाठी एका मोठ्या भांड्यात ऑलिव्ह ऑईल गरम करावे. नंतर त्यात जिरे घालून तडतडू घावे. आता एक कांदा चिरून हा चिरलेला कांदा भांड्यात घालून एक मिनिट परतून घ्यावा. नंतर लसूण बारीक कापून घ्यावे. बारीक कापलेले लसूण त्यात घालून आणखी एक मिनिट परतून घ्यावे. त्यानंतर बटाटा कापुन बटाटा भांड्यात घालून त्यात १ ते २ कप पाणी घालावे. नंतर त्यात चवीनुसार मीठ घालावे, भांडे झाकणाने झाकून ठेवून सुमारे १५ ते २० मिनिटे शिजू घावे. शिजल्यांनंतर सूपमध्ये फ्रेश क्रीम घालावी आणि इतर मिश्रणासोबत नीट मिक्स करावी. दोन मिनिटे शिजवून गॅस बंद करून घावा.आता तयार झालेले मिश्रण ब्लेंड करण्यासाठी इमर्शन ब्लेंडर वापरावे. त्यानंतर तयार झालेले मऊ सूप पॅनमध्ये काढून घावे.जर सूप जाड असेल, तर त्यात तुमच्या सोयीनुसार पाणी घालावे .सूप एका वाडग्यात काढून हलवावे. तसेच ओरेगॅनो, चिली फ्लेक्सने या पदार्थाने सर्व्ह करताना सजवावे.

अशा प्रकारे Special Rainy Garlic Soup तयार आहे.

हे ही वाचा:

Pavitra Rishta ला १४ वर्षे पूर्ण, Ankita Lokhande च्या पोस्टवर चाहते संतापले

थायलंड बॅटमिंटन स्पर्धेमध्ये दिग्गजांचा पराभव, किरण जॉर्जने केली उत्तम कामगिरी

पंकजा मुंडेंच्या विधानावर बावनकुळेंची प्रतिक्रिया

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss