spot_img
spot_img

Latest Posts

बाप्पासाठी बनवा खास रव्याचे मोदक

अवघ्या काही दिवसात गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. १९ सप्टेंबर रोजी गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे.

अवघ्या काही दिवसात गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. १९ सप्टेंबर रोजी गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. महाराष्ट्रामध्ये मोठ्या उत्साहात आणि आनंदात गणपती बाप्पाचे आगमन केले जाते. १० दिवसाच्या या उत्सवात गणपतीची विधीवत पूजा व अर्चना केली जाते. तसेच बाप्पाला गोडाच्या पदार्थाचा नैवेद्य दाखवला जातो. गणपती आगमनाच्या पहिल्या दिवशी सगळीकडे उकडीच्या मोदकांचा नैवेद्य बाप्पाला दाखवला जातो.काहीवेळा हे मोदक बाहेरून आणले जातात. पण आता आपण घरच्या घरी सोप्या पदतीने रव्याचे मोदक बनवू शकतो. चला पाहुयात रव्याच्या मोदकांची रेसिपी.
साहित्य:-
१ वाटी रवा
चवीनुसार मीठ
गरजेनुसार पाणी
१ नारळ
१ वाटी गूळ
चवीनुसार वेलची पावडर
आवश्यकतेनुसार सुखा मेवा
आवश्यकतेनुसार तूप

कृती:-
सर्वप्रथम मोदकाची पारी बनवण्यासाठी एक वाटी रवा घ्या. रवा नीट साफ करून चाळून घ्या. त्यानंतर गॅस चालू करून एक मध्यम आकाराचा टोप घ्या. त्यामध्ये १ ते दीड ग्लास पाणी आणि मीठ टाकून गरम करण्यासाठी ठेवा. गरम करायला ठेवलेल्या पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर त्यात रवा टाकून चमच्याने सतत ढवळून घ्या. पाण्यात टाकलेल्या रवयाच्या गुठळ्या होऊ देऊ नये. त्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यावी. एक वाफ घेऊन झाल्यानंतर रव्याचे पीठ एका ताटात काढून घ्यावे. थोडं थंड झाल्यानंतर ते चांगले मळून घ्यावे. मळून झाल्यानंतर त्याला तेल किंवा तूप लावावे.
मोदकाच्या आतील सारण बनवण्यासाठी १ नारळ घ्या. त्यातील खोबर किसून घ्या. त्यानंतर गॅसवर कढई ठेवून त्यात तूप टाकून ते गरम करण्यासाठी ठेवा. तूप गरम झाल्यानंतर त्यात किसलेले खोबर टाकून ते चांगलं भाजून घ्या. त्यानंतर त्यात गूळ टाकून मिक्स करा. गूळ आणि खोबर चांगलं मिक्स झाल्यानंतर त्यात चवीनुसार वेलची पावडर टाकून घ्या आणि आवश्यकतेनुसार सुखा मेवा टाका. हे सर्व करून झाल्यानंतर हाताला थोडासा तूप किंवा तेल लावून रव्याच्या पिठाचा छोटा गोळा करून घ्या आणि त्याची पारी बनवा. पारी बनवून झाल्यानंतर त्यात खोबऱ्याचे बनवलेले सारण टाकून मोदकाला छान काळ्या पडून घ्या. अश्या प्रकारे सर्व मोदक बनवून घ्या. त्यानंतर गॅसवर एक टोप ठेवून त्यात गरजेनुसार पाणी घालून त्यावर बनवललेया मोदकाची चाळण ठेवा . आणि ते नीट वाफवून घ्या. मोदक वाफवून झाल्यानंतर ते ताटात काढून घ्या आणि बाप्पाला नैवेद्य म्हणून दाखवा. तयार आहेत बाप्पासाठी खास रव्याचे मोदक.

हे ही वाचा: 

संभाजीनगरमधून एकनाथ शिंदेंनी केली घोषणा, मराठवाड्याला ५९ हजार कोटींचं मिळणार पॅकेज

मंत्रिमंडळाच्या बैठकीवर आदर्श ठेवीदारांचा मोर्चा, एकनाथ शिंदे म्हणाले…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss