पावभाजी हा असा पदार्थ आहे जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना आवडतो. अनेक जण विकेंड आला की बाहेर पाव भाजी खाण्याचा बेत करतात. पावभाजी घरी बनवायची म्हटलं की त्यात खूप वेळ जातो म्हणून काही जण घरी बनवणे टाळतात. पण आज कमी वेळेत आणि अगदी सोप्या पद्धतीने पाव भाजी कशी बनवायची याची सोपी रेसिपी पाहूया.
पाव भाजी रेसिपी
साहित्य:
- ४ मोठे बटाटे
- १ कप बारीक चिरलेला कोबी
- १ कप चिरलेला फ्लॉवर
- १/२ कप मटार
- १ कप चिरलेला गाजर
- २ मध्यम चिरलेले टोमॅटो
- २ मोठे चिरलेले कांदे
- २ चमचे आलं-लसूण पेस्ट
- २ चमचे पाव भाजी मसाला
- १ चमचा लाल तिखट
- १/२ चमचा हळद
- ३ चमचे बटर
- चवीनुसार मीठ
- २ चमचे तेल
- पाणी आवश्यकतेनुसार
- पाव (पाव भाजीसाठी)
लिंबू, चिरलेला कोथिंबीर व बारीक चिरलेला कांदा सजावटीसाठी आणि आवडत असेल तर वरून चीझ किसून टाका.
कृती:
१. भाजी शिजवणे:
बटाटे, कोबी, फ्लॉवर, मटार, गाजर कुकरमध्ये पाणी घालून ३ ते ४ शिट्ट्या येईपर्यंत शिजवून घ्या. नंतर भाजी मॅश करून बाजूला ठेवा.
२. भाजी तयार करणे:
कढईत तेल गरम करा. त्यात बटर घाला.
चिरलेला कांदा टाका व सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्या.
त्यात आलं-लसूण पेस्ट घालून परतून घ्या.
चिरलेले टोमॅटो घाला व ते मऊ होईपर्यंत परतून घ्या.
त्यात हळद, लाल तिखट व पाव भाजी मसाला घालून नीट मिक्स करा.
३. भाजी मिसळणे:
शिजवलेली व मॅश केलेली भाजी मसाल्यात टाका व मिक्स करा.
पाणी घालून हवी तशी पातळसर तयार करा.
चवीनुसार मीठ घालून १०-१५ मिनिटे मंद आचेवर शिजवा.
४. पाव तयार करणे:
तव्यावर बटर गरम करा. पाव अर्धे कापून त्यावर बटर लावून थोडं खरपूस भाजून घ्या.
हे ही वाचा :
पुण्यात आढळले Guillain Barre Syndrome चे संशयित रुग्ण, काय आहेत लक्षणे? Pune
Davos मध्ये पहिल्याच दिवशी महाराष्ट्राच्या विकासाला मोठा बुस्ट, पहिला करार राज्यातील Gadchiroli साठी