हिवाळ्याच्या दिवसात हमखास घरी तयार केला जाणारा पदार्थ म्हणजे गाजरचा हलवा. सगळ्या वयोगटातील लोकांना हा गोड पदार्थ खूप आवडतो. हिवाळ्यात गाजर ताजे, मोठे आणि गोड मिळतात, त्यामुळे गाजर हलवा अधिक चवदार आणि पौष्टिक होतो. हिवाळ्यात गाजर हलवा बनवणे एक लोकप्रिय प्रथा आहे, कारण तो शरीराला ऊर्जा देतो. गाजर हलव्यामध्ये तूप, दूध आणि ड्रायफ्रूट्स यांचा वापर केला जातो, जो शरीरासाठी खूप फायदेशीर असतो.
गाजर हे कुठल्याही सीझनमध्ये खाणे योग्यच आहे. परंतु हिवाळ्यात मिळणाऱ्या लालचुटुक गाजरांचा वापर जर आहारात करत असाल तर ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. गाजरमध्ये बीटा-कॅरोटिन (Vitamin A) चांगल्या प्रमाणात असतो, जो डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. गाजर रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करतो आणि हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम आहे. गाजरमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स हृदयाचे आरोग्य सुधारतात.त्यामुळे हिवाळ्यात गाजर हलवा खाल्ल्याने आरोग्य सुधारू शकते तर नक्की जाणून घ्या गाजर हलव्याची रेसिपी.
- गाजर हलवा बनवण्याचे साहित्य :
- गाजर (किसलेले) – ४-५ मध्यम आकाराचे
- कंडेन्स्ड मिल्क – १ कप
- दूध – १ कप
- साखर – आवडीप्रमाणे
- तूप – २-३ चमचे
- मनुके – १-२ चमचे
- वेलची पावडर – १/२ चमचे
- बदाम आणि काजू (सजावटीसाठी)
गाजर हलवा बनवण्याची कृती :
गाजर स्वच्छ धुऊन किसून घ्या. एका कढईत तूप गरम करा. त्यात किसलेली गाजर टाका आणि ५-१० मिनिटं मध्यम फ्लेमवर परतून घ्या. गाजर मऊ होईपर्यंत चांगलं शिजवून घ्या. आता कढईत दूध आणि कंडेन्स्ड मिल्क टाका. हे मिश्रण चांगले हलवून, गाजर आणि दूध एकत्र करा. मिश्रण उकळू द्या. मिश्रण उकळताना साखर टाका आणि चांगले हलवा. साखर पूर्णपणे वितळेपर्यंत हलवत राहा. गाजर आणि दूध क्रीम होईपर्यंत हलवून शिजवा. दूध कमी होईल आणि गाजर हलवा घट्ट होईल. हलवा घट्ट झाल्यावर त्यात वेलची पावडर आणि किसमिस टाका. सजवण्यासाठी बदाम आणि काजू टाका. हलवा तयार आहे! गरम गरम गाजर हलवा सर्व्ह करा.
हे ही वाचा :
“पक्षाने अपमानित केल्याची त्यांची…”Praful Patel यांचे भुजबळांविषयीचे वक्तव्य