Tuesday, April 23, 2024

Latest Posts

नेहमीच्या Coffe ला बनवा हटके, थंडीतही घ्या आस्वाद!

कॉफी प्यायला प्रत्येकालाच खुप आवडतं. बहुसंख्य लोकांसाठी चहा अमृततुल्य आहे. त्याच प्रमाणे अनेक लोकांसाठी कॉफी देखील अमृततुल्य आहे. अनेक जण कॉफीचे सेवन झोप न येण्यासाठी करतात.

कॉफी प्यायला प्रत्येकालाच खुप आवडतं. बहुसंख्य लोकांसाठी चहा अमृततुल्य आहे. त्याच प्रमाणे अनेक लोकांसाठी कॉफी देखील अमृततुल्य आहे. अनेक जण कॉफीचे सेवन झोप न येण्यासाठी करतात. कॉफी मध्ये मोठ्या प्रमाणात कॅफेन (caffeine) असते, याचा उपयोग आपल्याला जागे राहण्यासाठी आणि तरतरी ठेवण्यासाठी होतो. अनेकांचा तर कॉफी प्यायल्याशिवाय दिवसच जात नाही. बऱ्याच लोकांना तर दिवसातून अनेकदा कॉफी पिण्याची सवय असते. परंतु नेहमीची तीच तीच कॉफी प्यायल्याने अनेकांना कंटाळा येतो. म्हणूनच आज आम्ही कॉफीची हटके आणि थंड रेसिपी खास तुमच्या साठी घेऊन आलो आहोत.

उन्हाळ्यात प्रचंड उष्णतेमुळे आपल्याला गरम होत आणि भरपूर तहान लागते. भरपूर पाणी पिऊन ही आपली तहान भागत नाही. व आपल्याला काहीतरी थंड पिण्याची सारखी इच्छा होते. अनेकांना फावल्या वेळात कॉफी आणि चहा पिण्याची सवय असते. परंतु रखरखीत उन्हात हीच गरम कॉफी किंवा गरम चहा नको वाटतो. अशावेळेस सरबत, ज्यूस, कोल्ड्रींक किंवा गारेगार थंड काहीतरी प्यावेसे वाटते. म्हणूनच अनेक लोक कोल्ड कॉफी चे सेवन करतात. अलीकडच्या काळात हा तरुणांमधील कोल्ड कॉफी हा अगदी प्रसिद्ध कॉफीचा प्रकार आहे. चला तर मग बघुयात घरच्या घरी रखरखीत उन्हाळ्यात गारेगार करणारी कोल्ड कॉफी कशी तयार करावी.

कोल्ड कॉफी तयार करण्यासाठी लागणारे साहित्य –

कॉफी पावडर – २ चमचे
साखर – ४ चमचे
मिल्क पावडर – अर्धी वाटी
बर्फ – ५ ते ६ क्यूब
दूध – २ छोटे काप दूध
चॉकलेट सॉस – अर्धी वाटी
कोको पावडर – २ चमचे

कोल्ड कॉफी तयार करण्यासाठी पुढील कृती करावी –

सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यात कॉफी पावडर घालावी. ही फिल्टर कॉफीची किंवा इन्स्टंट कॉफी पावडर असू शकते म्हणून त्यामध्ये आपल्या आवडीनुसार साखर आणि बर्फाचे तुकडे घालावे. हे सगळे एकदा मिक्सरमधून फिरवून घ्यावे. नंतर याच भांड्यात थोडे दूध घालून पुन्हा हे मिश्रण फिरवून घ्यावे. सर्व चांगले एकजीव झाले की त्यामध्ये चॉकलेट सॉस, मिल्क पावडर आणि उरलेले दूध घालून पुन्हा सर्व चांगले मिक्सर फिरवून घ्यावे.कोल्ड कॉफी करत असलो तरी मिल्क पावडरमुळे या कोल्ड कॉफीला घट्टपणा येतो व चॉकलेट सॉसमुळे कॉफीच्या चवीत सुद्धा फरक पडतो. आता एका ग्लासला कडेने चॉकलेट सॉस आणि कोको पावडर लावून त्यात मिक्सरमधली कॉफी ओतून घ्यावी. तसेच जर आपल्याला आवडत असेल तर यात चोको चिप्स, कोको पावडर किंवा कॉफी पावडर वरुन घालू शकतो. त्यामुळे कोल्ड कॉफी दिसायला तर कॅफेमधल्यासारखी दिसतेच परंतु चवीलाही अगदी छान लागते. आता यामध्ये कॉफी थंड होण्यासाठी दोन क्यूब बर्फ घालावे. अशा प्रकारे रखरखीत उन्हात आपल्याला थंड करण्यासाठी तयार करता येते गारेगार कॉफी.

हे ही वाचा:

South Actor Harish Pengan यांनी वयाच्या ४९ वर्षी घेतला अखेरचा श्वास

संजय शिरसाट यांना पोलिसांकडून दिलासा

शिरपूरच्या तृप्तीची आधुनिक हिरकणी सारखीच गोष्ट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss