Friday, March 29, 2024

Latest Posts

घरच्या घरी बनवा पनीरचा हा चमचमीत पदार्थ…. जाणून घ्या संपूर्ण रेसिपी

बऱ्याच जणांना पनीरचे अनेक पदार्थ प्रचंड आवडतात. हॉटेलमध्ये गेल्यावर अनेक जण पनीर खाण्यास प्राधान्य देतात. पनीर हा भारतासह संपूर्ण जगभरात लोकप्रिय आहे. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्या माणसांना पनीरचे पदार्थ खूप आवडतात.

बऱ्याच जणांना पनीरचे अनेक पदार्थ प्रचंड आवडतात. हॉटेलमध्ये गेल्यावर अनेक जण पनीर खाण्यास प्राधान्य देतात. पनीर हा भारतासह संपूर्ण जगभरात लोकप्रिय आहे. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्या माणसांना पनीरचे पदार्थ खूप आवडतात. भारतात प्रत्येक हॉटेलमध्ये पनीरचे पदार्थ उपलब्ध असतात. भारतात लोकांकडून पनीरच्या पदार्थांसाठी मोठी मागणी केली जाते. त्यामुळे कुठल्याही हॉटेलमध्ये आपल्याला पनीरचे पदार्थ उपलब्ध होतात. बहुतेक लहानमुले इतर भाज्या खाण्यास नाक मुरडतात परंतु पनीरच्या भाजीवर अथवा अन्य पदार्थांवर ताव मारतात. पनीर आपल्या आरोग्यासाठी देखील अतिशय फायदेशीर आहे. पनीरमधून आपल्या शरीरासाठी उपयुक्त्त असे प्रोटीन (Protein) मोठ्या प्रमाणावर मिळते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला पनीर चिली (Paneer Chilli) ही घरच्या घरी कशी बनवायची याबद्दल सांगणार आहोत. तुम्हाला पनीर चिली बद्दल माहितीच असेल अथवा तुम्ही हॉटेलमध्ये जाऊन पनीर चिली खाल्ली सुद्धा असेल. पनीर चिली हा एक इंडो चायनीज (Indo Chinese) पदार्थ आहे. पनीर चिली हा एक स्टार्टर (Starter) चा प्रकार असून तुम्ही जेवणासोबतही खाऊ शकता. चला तर मग जाणून घेऊया ह्या पदार्थाची स्पेशल रेसिपी.

पनीर चिली बनविण्यासाठी लागणारे साहित्य –

२०० ग्रॅम पनीर
१ कप उभा चिरलेला कांदा
६-७ लसणीच्या पाकळ्या
२ उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या
१ चमचा व्हिनेगर (Vinegar)
१-४ चमचे मिरपूड
१-४ कप सोया सॉस
३ चमचे कॉनफ्लॉवर (Coneflower)
चवीनुसार मीठ
तेल

पनीर चिली बनवायची कृती –

सर्वप्रथम पनीरचे दोन तुकडे करून घ्या. तुमच्याकडे असलेला एक बाउल घ्या त्यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकून २ चमचे मीठ टाका. त्यात १-४ कप पाणी घालून थोडं घट्ट मिश्रण तयार करून घ्या, त्या मिश्रणात पनीरचे केलेले तुकडे घाला. त्यानंतर तुमच्याकडील पॅन गॅस वर ठेऊन त्यात फ्राय करण्यासाठी तेल घाला आणि त्या मिश्रणात घोळवलेले पनीरचे तुकडे तेलात शॅलो फ्राय करून घ्या. नंतर कढई गॅसवर ठेऊन गॅस पेटवा आणि २ चमचे तेल टाकून ते गरम करा तेल बऱ्यापैकी गरम झाल्यावर त्यामध्ये लसूण फोडणीला घाला. चांगल्याप्रकारे लसूण परतवून घ्या आणि लगेच नंतर त्यात हिरवी मिरची, कांदा तसेच भोपळी मिरची घालून व्यवस्थित परतवून घ्या. यानंतर २ चमचे सोया सॉस, शेजवान सॉस, मीठ, मिरपूड, व्हिनेगर घाला. त्यानंतर ३ ते ४ मिनिटे व्यवस्थित परतवून घ्या. त्यांनतर त्यामध्ये पनीरचे तुकडे घाला. नंतर तुमच्याकडे असलेल्या बाउलमध्ये उरलेले कॉर्नफ्लॉवर घ्या आणि त्यामध्ये १ किंवा २ कप पाणी टाका. पाण्यासोबतच सोया सॉस, चवीनुसार मीठ घालून मिश्रण तयार करा. आणि ते मिश्रण उकळावयाला ठेवा. उकळी आल्यानंतर तुम्ही ते सतत ढवळत रहा. सॉस घट्ट झाल्यावर पनीर आणि भाज्यांवर टाका. त्यानंतर वरून कांद्याची पात घालून व्यवस्थित परतवून घ्या. अशाप्रकारे तुमची चमचमीत पनीर चिली तयार होईल.

हे ही वाचा : 

बनवा नारळाच्या मलाईची खीर, पचनास अगदी हलकी!

हॉटेल स्टाईल Crispy Chili Chicken बनवा घरच्या घरी…

अत्याचाराच्या सर्वाधिक तक्रारी ठाणे जिल्यातून

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss