Friday, April 19, 2024

Latest Posts

पनीरचा हा एक सोप्पा पदार्थ बनवा अगदी काही मिनिटातच

पनीरपासून बनवलेले पदार्थ हे अनेकांना आवडतात. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत पनीर सगळ्यांचेच फेव्हरेट (Favourite) आहे.

पनीरपासून बनवलेले पदार्थ हे अनेकांना आवडतात. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत पनीर सगळ्यांचेच फेव्हरेट (Favourite) आहे. पनीरचे आरोग्यासाठी देखील अनेक फायदे आहेत. पनीरमधून आपल्याला जास्त प्रमाणात प्रोटिन्स मिळतात जे आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक असतात. पनीर खाल्याने आपल्या शरीरातील कॅल्शियम वाढते व आपली हाडे मजबूत होतात. लहानमुले शाळेतून किंवा खेळून आल्यावर भरपूर दमतात त्यामुळे त्यांना प्रचंड भूक लागते. लहान मुलांना नेहमीच काहीतरी चमचमीत खायला हवं असते. पण त्यांना रोज बाहेरचे पदार्थ दिल्यास त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतात. बाहेरचे पदार्थ खाल्ले तर मुलांना त्रास होऊ शकतो शिवाय बाहेरचे पदार्थ कमी दर्जाच्या पदार्थांमध्ये बनवतात. म्हणूनच तुम्ही त्यांच्यासाठी घरीच चमचमीत पदार्थ बनवून त्यांना खाऊ घालू शकता. आज आम्ही तुम्हाला अशीच एक पनीर पासून बनविली जाणारी रेसिपी सांगणार आहोत. त्या रेसीपीचे नाव म्हणजे पनीर ब्रेड रोल (Paneer Bread Roll).

पनीर ब्रेड रोल बनविण्यासाठी लागणारे साहित्य –

किसलेले पनीर १ कप
आलं लसूण पेस्ट १ चमचा
लाल तिखट अर्धा चमचा
गरम मसाला अर्धा चमचा
चाट मसाला १ चमचा
टोमॅटो सॉस १ चमचा
हिरवी धणे १ चमचा
चवीनुसार मीठ
बटर २ चमचे
तेल

पनीर ब्रेड रोल बनविण्यासाठीची कृती –

सर्वप्रथम ब्रेड घेऊन त्याची काट सुरीने काढून टाका त्यानंतर तुमच्याकडे असलेले एक भांडे घेऊन त्यात पनीर, आले-लसूण पेस्ट, बटर, लाल तिखट, गरम मसाला, चाट मसाला, टोमॅटो सॉस घालून व्यवस्थित मिश्रण करून घ्या. त्यानंतर काट काढलेले ब्रेड घ्या व त्या ब्रेडला अगदी थोड्या प्रमाणात पाणी लावा आणि तयार केलेला पनीरच्या मसाल्याचे मिश्रण ब्रेडवर ठेवा आणि त्याचा रोल करा. त्यानंतर एक कढई गॅसवर ठेवून त्यात तळण्यासाठी तेल घ्यावे व गरम करत ठेवावे. तेल थोडे गरम झाल्यावर तयार केलेले रोल हे तेलामध्ये सोडा आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत चांगल्याप्रकारे तळून घ्या. अशाप्रकारे तुमचे पनीर ब्रेड रोल तयार होईल.

हे ही वाचा:

Vat Pournima 2023: वटपौर्णिमेनिमित्त अशा पद्धतीने सजवा पूजेचे ताट

“आदिपुरुष” चित्रपटातील गाणे झाले रिलीज, प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद

घरच्या घरी बनवा हा पौष्टीक नाश्ता; रक्तवाढीसाठी फायदेशीर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss