spot_img
Sunday, January 19, 2025

Latest Posts

नवीन वर्षानिमित्त बनवा बटाट्याची ‘ही’ रेसिपी; चव कायम राहील लक्षात!

Potato Cheese Balls Recipe : बटाट्याचे अनेक पदार्थ आपण अनेकदा ट्राय केलं असतील. फ्रेंच फ्राईज, बटाट्याचे काप, बटाट्याची भजी असे अनेक पदार्थ अगदी काहीच मिनिटांत आपण घरच्या घरी बनवत असतो.पण नवीन वर्षानिमित्त पोटॅटो चीज बॉल्स ही एक लोकप्रिय आणि स्वादिष्ट स्टार्टर रेसिपी तुम्ही नक्की बनवून बघा. हे पोटॅटो चीज बॉल्स तुम्ही फ्रिज करून ठेऊ शकता आणि तुम्हाला हवं तेव्हा तळून खाऊ शकता. चला तर मग जाणून घेऊ या ‘पोटॅटो चीज बॉल्स’ची रेसिपी.

पोटॅटो चीज बॉल्स बनवण्याचे साहित्य :
> २ उकडलेले बटाटे

> १ चिरलेला कांदा

> १ चिरलेली हिरवी मिरची

> १ टेबलस्पून लाल मिरची पावडर

> अर्धा टेबलस्पून मीठ

> अर्धा टेबलस्पून गरम मसाला

> कोथिंबीर

> चीज

> २ टेबलस्पून कॉर्नफ्लोर

> १ टेबलस्पून मैदा

> ब्रेडक्रम्ब्स (तळण्यासाठी)

पोटॅटो चीज बॉल्स बनवण्याची कृती :
एका भांड्यात २ उकडलेली बटाटी मॅश करा. मॅश केलेल्या बटाट्यात किसलेलं चीज, आलं-लसूण पेस्ट, मिरची पूड, गरम मसाला, धणे पूड, हिंग, ओवा आणि मीठ घाला. हे सर्व चांगले मिक्स करून घ्या. मिश्रणाचे छोटे बॉल्स तयार करून. बॉल्सना मैदा आणि कॉर्नफ्लोरचा मिश्रणात घोळून घ्या, ज्यामुळे बॉल्स कुरकुरीत होतील. कढईत तेल गरम करा. गरम झालेल्या तेलात बॉल्स सोनेरी रंग होईपर्यंत तळा. गरमागरम पोटॅटो चीज बॉल्स टोमॅटो केचप किंवा चटणीसोबत सर्व्ह करा.अशाप्रकारे तुम्ही स्वादिष्ट आणि कुरकुरीत पोटॅटो चीज बॉल्स तयार आहेत.

हे ही वाचा:

लाचखोर वनक्षेत्रपालाच्या घराची झडती; 57 तोळं सोनं अन् 1 कोटी 31 लाखांची कॅश

“आता खरी मजा आहे”, Manoj Jarange Patil यांची Devendra Fadnavis यांच्यावर टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss