Thursday, April 25, 2024

Latest Posts

घरच्या घरी बनवा हा पौष्टीक नाश्ता; रक्तवाढीसाठी फायदेशीर

प्रत्येकघरी नाश्त्याला काय बनवायचे यावरून नक्कीच वादविवाद होत असतील. प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असून दररोज नाश्त्याला काय बनवायचे असा मोठा प्रश्न गृहिणींना नक्कीच पडत असेल. सकाळचा नाश्ता हा राजा सारखा करावा असे म्हंटले जाते.

प्रत्येकघरी नाश्त्याला काय बनवायचे यावरून नक्कीच वादविवाद होत असतील. प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असून दररोज नाश्त्याला काय बनवायचे असा मोठा प्रश्न गृहिणींना नक्कीच पडत असेल. सकाळचा नाश्ता हा राजा सारखा करावा असे म्हंटले जाते. बहुतांश घरी नाश्तासाठी शिरा अथवा पोहेच बनविले जातात ते खाऊन लहानमुलांसोबतच मोठी माणसं देखील कंटाळून जातात. त्यामुळे काहीवेळेस आपण सकाळचा नाश्ता बाहेरून आणतो. पण बाहेरच्या नाश्त्याने फक्त पोट भरेल पण आपल्या शरीरासाठी आवश्यक असलेले पोषक घटक आपल्याला मिळणार नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला एका पौष्टीक नाश्त्याची रेसिपी सांगणार आहोत. त्या पौष्टीक नाश्त्याचे नाव म्हणजे बीटापासून बनविलेले पराठे. बीट हे आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे. बीटमुळे आपल्या शरीरातील रक्त वाढते. बीटमध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक असतात. खनिजे व जीवनसत्वे यांचे प्रमाण बीटामध्ये भरपूर असते. बीटाचे आपल्या दैनंदिन आहारात सेवन केल्याने आपल्या मेंदूचे कार्य वाढते. चला तर मग जाणून घेऊया बीटाचे पराठे बनवतात तरी कसे.

बीटाचे पराठे बनविण्यासाठी लागणारे साहित्य:

गव्हाचे पीठ २ कप
बेसन पीठ १ कप
उकडलेले बीट ५
हिरव्या मिरच्या ४ किंवा ५
आलं आणि लसूण
ओवा
तूप
दही
चवीनुसार मीठ

बीटाचे पराठे बनविण्यासाठीची कृती

सर्वप्रथम बीट उकडून घेयल्यावर बीटवर असलेली सालं काढून बीट किसून घ्यावे. त्यानंतर एका भांड्यात गव्हाचे पीठ घ्यावे त्यात बेसनाचे पीठ, किसलेले बीट , आलं लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट, हळद, ओवा, आणि चवीनुसार मीठ घालून घ्या. त्यानंतर त्यामध्ये थोडेसे तूप घालून व्यवस्थित मळून घट्ट करून घ्यावे. त्यानंतर तयार झालेला गोळा साधारण अर्धा तास झाकून ठेवा. त्यानंतर लहान गोळे तयार करून कोरड्या पिठात हाताने लाटून घ्या. त्यानंतर तुमच्याकडे असलेला तवा घ्या आणि मंद आचरेवर गॅसवर ठेवून त्यात तूप टाकून पराठा व्यवस्थित भाजून घ्यावा. तुम्ही या गरमागरम पराठ्यांसोबत दही अथवा हिरवी चटणी खाऊ शकता.

हे ही वाचा:

पुढच्या आठवड्यापर्यंत येणार मान्सून केरळमध्ये; मुख्यमंत्रांकडून आढावा बैठकांना सुरवात

“आदिपुरुष” चित्रपटातील गाणे झाले रिलीज, प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss