१४ जानेवारीला मकरसंक्रांत साजरी केली जाते. या दिवशी अनेक लोक आपल्या घरी तिळाचे लाडू बनवतात. परंतु कामात व्यस्त असल्यामुळे,लाडू बनवता येत नसतील तर ही रेसेपी तुम्हाला नक्की मदत करेल. मकरसंक्रांतीच्या दिवशी प्रत्येक घरात गुळ, तीळ, आणि शेंगदाण्याचा वापर करून अनेक पदार्थ केले जातात. यात प्रामुख्याने तिळाचे लाडू बनवलं जातात. पण ते बनवताना अनेकांना अडचणी येतात. नेमकं काय चुकत ते समजत नाही. त्यामुळे आज आपण जाणून घेणार आहोत तिळाच्या लाडूंची रेसीपी अगदी सोप्या पद्धतीत.
तीळ आणि गुळाचे लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य:
अर्धा वाटी तीळ, १ वाटी गुळ, १ वाटी शेंगदाणे, ८-१० बदाम, चिमटीभर वेलचीपूड, १ वाटी नारळ काप
कृती:
गुळचे छोटे तुकडे करून कढईत ठेवा.नंतर गॅसवर गुळ हलक्या आचेवर वितळत ठेवा. पाणी घालू नका. गुळ हलका वितळल्यावर तो गोडसर ग्यालासारखा होईल. गूळ वितळल्यावर त्यात भाजलेले तीळ, शेंगदाणे, वेलची पूड, नारळ काप, बदाम आदी सर्व साहित्य घाला. आणि मिश्रण चांगले मिक्स करा. मिश्रण गार होईपर्यंत हातात तूप लावून लाडू बनवा. मिश्रण गार व्हायच्या आधीच लाडू बनवले गेले पाहिजे नाहितर चांगले वळले जात नाहित.
हे ही वाचा:
बर्थडेचं खास गिफ्ट म्हणून चाहतीने गोंदवला खास टॅटू!