Wednesday, June 7, 2023

Latest Posts

न्यू स्टाईलमध्ये बनवा White Sauce Pasta

पास्ता ही एक प्रसिद्ध इटालियन रेसिपी आहे. विविध प्रकारच्या सॉसेसमध्ये पास्ता बनवता येतो.

पास्ता ही एक प्रसिद्ध इटालियन रेसिपी आहे. विविध प्रकारच्या सॉसेसमध्ये पास्ता बनवता येतो. घरीच बनवता येण्यासारखी व्हाइट सॉसमधील पास्ताची क्रिमी रेसिपी केवळ लहान मुलांच्याच नव्हे तर मोठ्यांच्याही खास आवडीची आहे. चला तर म करूया घरच्या घरी व्हाइट सॉसमध्ये पास्ता बनविण्याची रेसिपी.

व्हाईट सॉस बनवण्याचे साहित्य –

१ कप पास्ता, अर्धा चमचा तेल, १ कप बेबी कॉर्न, १ चमचा ओरिगॅनो, १ मध्यम चिरलेली शिमला मिरची, पावणे तीन कप दूध, अर्धा चमचा मिरपूड, पाव चमचा ताजी मलई, थोडे मशरूम, चिरलेला १ छोटा टोमॅटो, अडीच कप पाणी, चवीनुसार मीठ, २ चमचे लोणी, १ चिरलेला कांदा, २ चमचे मैदा, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, १०० ग्रॅम चीझ, चिरलेला १ गाजर, चिरलेली १ लहान कोबी.

 

कृती –

सर्वप्रथम, एका भांड्यात पाणी घेऊन त्यात थोडे तेल आणि मीठ घालून एक मिनिटे मोठ्या आचेवर ठेवा. पाणी गरम झाले की त्यात पास्ता घाला आणि पुढील १० मिनिटांसाठी मध्यम आचेवर पास्ता शिजू द्या. पास्ता चांगला शिजण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. पास्ता शिवल्यानंतर त्यातील पाणी गाळून घ्या.सर्व भाज्या बारीक चिरून घ्या. एका भांड्यात थोडे बटर घालून त्यात कांदा परतून घ्या. नंतर मशरूम, बेबी कॉर्न, शिमला मिरची, ओरिगॅनो घालून ५ मिनिटे परता. २ चमचे मैदा घालून पुन्हा थोडे परतून घ्या. आणि नंतर मीठ, मिरपूड, लाल मिरची पावडर, दूध घालून मिश्रण ६ मिनिटे शिजवा. आता त्यात क्रिम आणि शिजवलेला पास्ता घालून दोन मिनिटे चांगले शिजू द्या. वरून चीझ घालून हे भांडे मंद आचेवर एका तव्यावर ५ मिनिटे ठेवून शिजवा. म्हणजे पास्ता खाली लागणार नाही. गरम व्हाइट सॉस पास्ता सर्व्ह करा.

Latest Posts

Don't Miss