spot_img
Sunday, February 9, 2025

Latest Posts

घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट सारखा Manchow Soup

आपण बाहेर जेवायला गेल्यावर बऱ्याचदा रेस्टॉरंटमध्ये मंचाव सूप खाल्लेलं असतं. त्याची चव काय औरच असते. अनेकांचे असेही म्हणणे आहे रेस्टॉरंट सारखा मंचाव सूप घरी होत नाही. अनेकांच्या आवडीचं असलेलं हे मंचाव सूप नेहमीच बाहेरून विकत घेण्यापेक्षा किंवा बाहेर जाऊन खाण्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी अगदी झटक्यात रेस्टॉरंट पद्धतीने बनवू शकता. याची चवदेखील अगदी रेस्टॉरंटमध्ये बनवलेल्या मंचाव सूपसारखीच स्वादिष्ट असेल. चला तर मग आज पाहूया रेस्टॉरंट सारखा घरच्या घरी मंचाव सूप कसे बनवायचा.

साहित्य (Material) –

४-५ लसूण पाकळ्या, आलं, हिरवी मिरची, अर्धी चिरलेली शिमला मिरची, एक वाटी चिरलेली कोबी, १ टेबलस्पून सोया सॉस,
२ टेबलस्पून लाल तिखट सॉस, १ टेबलस्पून टोमॅटो सॉस, १ टेबलस्पून व्हिनेगर, अर्धा लिटर पाणी, २ टेबलस्पून कॉर्नफ्लोर

कृती- (Manchow Soup Recipe)

एका कढईमध्ये ४-५ बारीक चिरलेली लसूणच्या पाकळ्या, किसलेलं आलं आणि चिरलेली हिरवी मिरची टाका. त्यात चिरलेली कांदेपात, १ बारीक चिरलेला गाजर, अर्धी चिरलेला शिमला मिरची आणि एक वाटी चिरलेली कोबी टाका. बाकी तुम्हाला आवडेल तश्या इतर भाज्या देखील टाकू शकता. सर्व छान परतून घ्या. त्यात १ टेबलस्पून सोया सॉस, २ टेबलस्पून लाल तिखट सॉस, १ टेबलस्पून टोमॅटो सॉस आणि १ टेबलस्पून व्हिनेगर टाका. अर्धा लिटर पाणी आणि कॉर्नफ्लोरची स्लरी (२ टेबलस्पून कॉर्नफ्लोर आणि ५ टेबलस्पून पाणी) घालून मिक्स करा. ५ मिनिटे उकळा. कांद्याची पात आणि तळलेले नूडल्स घालून सजवा. तुमचा हिवाळ्यातला खास मंचाव सूप तयार आहे. गरमागरम सूप पिऊन आस्वाद घ्या.

हे ही वाचा :

हाडांतील Calcium कमी झाल्यावर ओळखायचे कसे?

वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये होणाऱ्या जिल्हा नियोजन बैठकीत उपमुख्यमंत्री Eknath Shinde व आमदार Aaditya Thakare समोरासमोर येण्याची शक्यता

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss