spot_img
spot_img

Latest Posts

Modak Recipe, साखर आणि गुळ न वापरता सोप्या पद्धतीने बनवा नाचणीचे उकडी मोदक

गणपती बाप्पाला मोदक खूप प्रिय आहेत. जिथे बाप्पा तिथे मोदक हे समीकरण ठरलेलेच असते. गणेश चतुर्थीला आपण बाप्पासाठी विविध प्रकारचे मोदक करतो. साखर-गुळ घालून आपण नेहमीच मोदक करत असतो.

गणपती बाप्पाला मोदक खूप प्रिय आहेत. जिथे बाप्पा तिथे मोदक हे समीकरण ठरलेलेच असते. गणेश चतुर्थीला आपण बाप्पासाठी विविध प्रकारचे मोदक करतो. साखर-गुळ घालून आपण नेहमीच मोदक करत असतो. पण नाचणीचे उकडीचे मोदक हे साखर किंवा गुळ अजिबात न वापरता करता येतात. हे मोदक चवीला सुरेख आणि सुकामेवा घालून केलेले असल्यामुळे हे तब्येतीसाठी अतिशय उत्तम आहेत. चला तर मग नाचणीचे उकडी मोदक हे साखर किंवा गुळ अजिबात न घालता कसे बनवतात? हे जाणुन घेऊया.

साहित्य –
१ वाटी नाचणीचे पीठ
१ वाटी खजुर
पाव वाटी तांदूळ पिठी
पाऊण वाटी काजू
पाऊण वाटी बदाम
पाऊण वाटी मनुका
पाऊण वाटी अक्रोडचे तुकडे.
१ वाटी ओल्या नारळाचे खवलेले खोबरे
साजूक तूप
मीठ (चवीनुसार)
वेलदोडा पूड

कृती – सर्वप्रथम एका वाडग्यात नाचणी आणि तांदुळाचे पीठ हे मिक्स करून घ्यावे. त्यात जितके पीठ तितकेच पाणी म्हणजे सव्वा वाटी पाणी हे गॅसवर उकळत ठेवावे. त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ आणि १ चमचा साजूक तूप घालून या पाण्याला उकळी आणावी. उकळलेल्या पाण्यात पीठ घालून ढवळून घ्यावे. ते पीठ झाकून थंड करायला ठेवून द्यावे. नंतर एका पॅनमध्ये २ चमचे साजूक तूप घेऊन ते गरम करून घ्या. त्यात बिया काढून बारीक चिरलेला खजूर घाला आणि तो तुपावर छान परतवून मऊ करून घ्यावा. खजूर मऊ झाला की त्यात ओले खोबरे घाला. त्यानंतर गॅस मंद आचेवर ठेवा आणि ते मिश्रण एकजीव करून घ्यावे. त्या मिश्रणात वेलदोडा पूड आणि ड्रायफ्रूट घालून ते छान परतून मिश्रण एकजीव करून घ्या आणि ते मिश्रण थंड करायला ठेवावे. थंड झालेली पिठाची उकड गरजेनुसार थोडे थोडे थंड पाणी घालून मऊ मळून घ्यावी. पिठाचा छोटा गोळा बनवून अंगठा आणि तर्जनी च्या सहाय्याने खोलगट वाटी बनवून त्यामध्ये सारण भरून वाटीला पाकळ्या तयार करून घ्या. या मोदकाच्या पाऱ्या अलगद एकत्र जोडत त्याचे तोंड बंद करून मोदकाचा आकार द्यावा. एका भांड्यात उकळून त्यावर चाळण ठेवून हे मोदक ठेवा. त्यानंतर झाकण ठेवून ते १० मिनिटे वाफवावेत. उकडलेल्या मोदकांवर तुपाचा ब्रश फिरवून गंध, चव आणि चमक आणावी. तयार झालेले आहेत नाचणीचे उकडी मोदक.

हे ही वाचा:

भाजीतले जास्तीचे तेल काढण्याच्या ३ सोप्या टीप्स

Ganeshotsav 2023, गॅस ही न पेटवता करा झटपट इंस्टंस्ट Kaju Katali Modak

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss