spot_img
Monday, January 13, 2025

Latest Posts

New Year Cake Recipe : घरच्या-घरी बनवा ‘हे’ ३ प्रकारचे केक; न्यु ईयर पार्टीत होईल तुमचं खूप कौतुक

New Year Cake Recipe : घरच्या-घरी बनवा ‘हे’ ३ प्रकारचे केक; न्यु ईयर पार्टीत होईल तुमचं खूप कौतुक

New Year Cake Recipe : नववर्षानिमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. नववर्षानिमित्त अनेकजण बाहेर केक विकत घेत असतात, तर तस न करता तुम्हाला तुमची न्यू ईयर पार्टी खास करायची असेल तर घरच्या-घरी बनवा ‘हे’ ३ प्रकारचे केक, तर इथे दिलेली रेसिपी नक्की वाचा यामुळे तुमचे पैसे नक्कीच वाचतील आणि केकही सुंदर तयार होईल.

चॉकलेट न्यु ईयर पाउंड केक रेसिपी
१. पाउंड केक बनवण्याचे साहित्य :
> पीठ – १ कप
> कोको पावडर – अर्धा कप
> साखर – १ कप
> अंडी – २
> दूध – १ कप
> लोणी – अर्धा कप
> बेकिंग सोडा – अर्धा टीस्पून
> व्हॅनिला एसेन्स – अर्धा टीस्पून

पाउंड केक बनवण्याची कृती :
सर्वात पहिले ओव्हन १८० अंशांवर प्रीहीट करून घ्या. तर दुसऱ्याबाजूला एका भांड्यात पीठ, कोको पावडर, साखर, अंडी , दुध, लोणी, बेकिंग सोडा, व्हॅनिला एसेन्स हे वरती दिलेल्या प्रमाणानुसार घेऊन हे सारे मिश्रण एकजीवकरून चांगले फेटून घ्या. जर ते खूप पातळ असेल तर त्यात जास्त दूध घालावे. तयार मिश्रण केक पॅनमध्ये मिश्रण टाका. बेकिंग टिन बटर पेपरने झाकून ठेवा. नंतर मिश्रण चांगले ओतून ओव्हनमध्ये ठेवा आणि सुमारे 30-40 मिनिटे बेक करा. केक बाहेर काढण्यापूर्वी तयार आहे का ते तपासा.तयार केक टूथबिक घालून चेक करून घ्या. केक चांगला शिजला असेल तर प्लेटमध्ये काढून थंड झाल्यावर तुम्हाला आवढेल त्या पद्धतीने सजवून तो सर्व्ह करा.

२. न्यु ईयर स्पेशल फ्रूट्स पाउंड केक :
फ्रूट्स पाउंड केक बनवण्याचे साहित्य :
> पीठ – १ कप
> साखर – १ कप
> लोणी – अर्धा कप
> सुका मेवा – अर्धा कप
> कंडेन्स्ड दूध – १ कप
> अंडी – २
> संत्र्याचा रस – अर्धा कप
> बेकिंग पावडर – १ टीस्पून
> दालचिनी पावडर – १टीस्पून
> व्हॅनिला एसेन्स – अर्धा टीस्पून
> जायफळ पावडर- अर्धा टीस्पून

फ्रूट्स पाउंड केक बनवण्याची कृती :
सर्वात पहिले ड्रायफ्रूट्स संत्र्याच्या रसात ३० मिनिटे भिजवून ठेवा. एका बाजून ओव्हन १८० अंशांवर प्रीहीट करून घ्या. बटर पेपरने बेकिंग टिन कव्हर करू शकता किंवा बटर लावून पीठ हलके शिंपडा. तर दुसरीकडे एका भांड्यात बटर आणि साखर हलक्या हाताने मऊ होईपर्यंत फेटून घ्या. एक एक करून अंडी घालून मिश्रण चांगले फेटून घ्या. डेन्स्ड मिल्क आणि व्हॅनिला इसेन्स घाला. एका वेगळ्या भांड्यात मैदा, बेकिंग पावडर, दालचिनी आणि जायफळ पावडर चाळून घ्या. हे कोरडे मिश्रण हळूहळू ओल्या मिश्रणात मिसळा. पिठात भिजवलेले ड्रायफ्रुट्स आणि तुटी-फ्रुटी हलक्या हाताने मिक्स करा. तयार मिश्रण पीठ बेकिंग टिनमध्ये ओता. ३५-४० मिनिटे बेक करा. तयार केक टूथबिक घालून चेक करून घ्या. केक १०-१५ मिनिटे थंड होऊ द्या.
नंतर टिनमधून काढा आणि त्याचे तुकडे करा आणि पार्टीमध्ये सर्व्ह करा.

३. बेसन कप केक रेसिपी
बेसन कप केक बनवण्याचे साहित्य :
> साखर – अर्धा कप
> डार्क चॉकलेट – १ कप
> लोणी – अर्धा कप
> बेसन -२ वाट्या
> बेकिंग पावडर – १ टीस्पून
> गोड सोडा – १ टीस्पून
> दही – १ कप
> वेलची पावडर – एक चिमूटभर
> व्हिपिंग क्रीम – २ कप

बेसन कप केक बनवण्याची कृती :
बेसनाचे कपकेक बनवण्यासाठी एका भांड्यात अर्धा कप बटर आणि साखर घालून हलक्या हाताने मऊ होईपर्यंत फेटून घ्या. नंतर त्या दही, बेसन, बेकिंग पावडर, गोड सोडा आणि चिमूटभर वेलची पावडर घाला. नंतर या सर्व गोष्टी एकजीव करून हे मिश्रण चांगले फेटून घ्या, त्यात गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्या. कोरडे मिश्रण दह्याच्या मिश्रणात मिसळा. स्पॅटुलाच्या मदतीने सर्वकाही मिसळा. एका बाजून ओव्हन 180 सेल्सिअसवर प्रीहीट करा. कप केक मोल्डमध्ये बटर पेपर लावा आणि प्रत्येकामध्ये 100 ग्रॅम पिठ घाला. केक 20-22 मिनिटे बेक करण्यासाठी ओव्हनमध्ये ठेवा आणि नंतर बाहेर काढा आणि थंड होण्यासाठी ठेवा. नंतर केकवर चॉकलेट आणि व्हीप्ड क्रीम लावा. तुमचा घरगुती कप केक तयार आहे.

Latest Posts

Don't Miss