spot_img
spot_img

Latest Posts

गणपती बाप्पाच्या नैवेद्याला तिखट मीठाचे छान खमंग मोदक

गणपती बाप्पाचा प्रसाद म्हटल की मोदकाशिवाय आपल्या डोळ्यासमोर दुसरं काही येतच नाही. मोदकांमध्ये उकडीचे, तळणीचे, खव्याची, चॉकलेटचे किंवा या पेक्षा जास्त प्रकारचे मोदक आपण १० दिवसात आवर्जुन करतो.

गणपती बाप्पाचा प्रसाद म्हटल की मोदकाशिवाय आपल्या डोळ्यासमोर दुसरं काही येतच नाही. मोदकांमध्ये उकडीचे, तळणीचे, खव्याची, चॉकलेटचे किंवा या पेक्षा जास्त प्रकारचे मोदक आपण १० दिवसात आवर्जुन करतो. पण सतत गोड खाऊन एकतर कंटाळा येतो आणि डायबिटीस असेल तर गोड खाण्यावरही बंधने येतात. अशा वेळी गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी आणि प्रसादासाठी थोडे वेगळं काही करायचे असेल तर तिखट-मीठाचे खमंग मोदक ही करु शकतो. गणपतीत सतत गोड खायचा कंटाळा आला असेल तर हा खूप मस्त पर्याय आहे. हे सारण करायला ही अगदी सोपे आहे. हे मोदक लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अगदी आवडीने खाल्ले जातात. झटपट होणारे आणि २ ते ३ दिवस छान टिकणारे हे तळणीचे मोदक कसे करायचे ते जाणुन घेऊयात.

साहित्य –
१ वाटी सुके खोबरे
अर्धी वाटी दाण्याचा कूट
पाव वाटी तीळ
१ चमचा गोडा मसाला
अर्धा चमचा धने पुड
अर्धा चमचा जिरे पुड
अर्धा चमचा लाल तिखट
पाव चमचा आमचूर पावडर
अर्धी वाटी बेसन पीठ
२ वाट्या गव्हाचे पीठ
१ वाटी तेल
साखर (चवीनुसार)
मीठ (चवीनुसार)

कृती –
सर्वप्रथम खोबरे चांगले किसून घ्या. त्यानंतर गॅस चालू करून ते किसलेले खोबरे परतून घ्या. ते लालसर होत आले की एका ताटात काढून ठेवा. याचप्रमाणे बेसन ही लालसर होईपर्यंत खरपूस भाजून घ्या. यामध्ये दाण्याचा कूट आणि तीळ घालून पुन्हा ते थोडे परतून घ्या आणि त्यात भाजलेले खोबरे घाला. गॅस बंद करुन या मिश्रणात आपल्या आवडीप्रमाणे गोडा मसाला, तिखट, धने पूड, जीरे पूड, आमचूर पावडर, मीठ आणि साखर चवीनुसार घालून मिश्रण चांगले एकजीव करुन घ्या. हे मिश्रण एका ताटात काढून घ्या. ते मिश्रण गार होईपर्यंत मोदकांसाठी कणीक मळून घ्या. गव्हाच्या पीठ, मीठ, तेल घालून घट्टसर थोडे थोडे पाणी टाकून कणीक मळा. मोदकामध्ये आपण ज्याप्रमाणे सारण भरतो. त्याचप्रमाणे पुऱ्या लाटून घेऊन त्यामध्ये हे सारण भरून घ्या आणि मोदक छान वळून घ्या. गॅसवर एक कढई ठेवा. कढईमध्ये तेल चांगले तापले की हे मोदक खरपूस रंग येई पर्यंत तळून घ्या. हे मोदक २ -३ दिवस चांगले राहतात.

हे ही वाचा: 

Ganeshotsav 2023, पुण्यातील मंडपाची आणि गणशेमूर्तीसाठी महानगरपालिकेने केली नियमावली जाहीर

परदेशात राहणाऱ्या लोकांनी गणपती कोणत्या तारखेला बसवावा? जाणुन घ्या

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss