spot_img
Wednesday, March 19, 2025

Latest Posts

ना मशीन, ना कंडेन्स मिल्क; घरच्या-घरी बनवा हे थंडगार आईस्क्रीम

आता लवकरच उन्हाळासुरु होणार आहे आणि प्रत्येकाला काहीतरी थंड खाण्याची इच्छा होत असते. अशावेळी तुम्ही लिंबूपाणी, फ्रुट जूस किंवा आईस्क्रीम खायची इच्छा होते. नेहमी नेहमी बाहेरच खायला देखील भीती वाटते आणि वायफळ पैसे खर्च होत असतात. त्यामुळे जर तुम्ही घरच्या-घरी कमीत कमी पैशात तयार होणारे आईस्क्रीम नक्की करून बघा.

तुम्ही तुम्हाला आवडतील ती फळे किंवा आवडतील त्या नट्सचे आईस्क्रीम बनवून खाऊ शकता. पण तुम्ही (Cashew Custard Ice Cream) हे नक्की घरी बनवून पहा. तुम्हाला निश्चितच आवडेल. आईस्क्रीम बनवण्यासाठी बेकिंगची किचकट प्रोसेस नसल्यामुळे तुम्ही मोजक्या सामानात हे आईस्क्रीम बनवू शकता. या आईस्क्रीमचा महत्वाचा इंग्रिडियन्ट म्हणजे ‘काजू’. काजूमध्ये मोनोसॅच्युरेटेड फॅट्स आणि पॉलिसॅच्युरेटेड फॅट्स भरपूर प्रमाणात असतात, जे हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त असतात. हे “चांगले” कोलेस्ट्रॉल (HDL) वाढवण्यास मदत करतात आणि “वाईट” कोलेस्ट्रॉल (LDL) कमी करतात, ज्यामुळे हृदयविकारांचा धोका कमी होतो. काजूमध्ये प्रोटीन आणि फायबर्स असतात, जे शरीराला भरपूर ऊर्जा देतात आणि जास्त खात बसण्यापासून बचाव करतात. काजूच्या नियमित सेवनामुळे वजन नियंत्रणात ठेवणे सोपे होऊ शकते. त्यामुळे हे हेल्दी आईस्क्रीम घरी नक्की तयार करून बघा. नक्की वाचा रेसिपी.

काजू कस्टर्ड आईसक्रिम बनवण्याचे साहित्य :

  • १ कप काजू (साधारण १५० ग्राम)
  • १ कप दूध
  • १/२ कप पाणी
  • १/२ कप साखर (आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता)
  • १ चमचा वेलची पूड
  • १ चमचा कस्टर्ड पावडर (वॅनिला फ्लेवर)
  • १/२ कप क्रीम (ऑप्शनल, आईसक्रिमला क्रिमी बनवण्यासाठी)

काजू कस्टर्ड आईसक्रिम बनवण्याची कृती :
मिक्सरमध्ये काजूची बारीक पावडर करून घ्या. काजूची पावडर जितकी बारीक होईल, तितकी आईसक्रिमची चव वाढेल. एका वाटीत १/२ कप दूध घेऊन त्यात कस्टर्ड पावडर घाला आणि चांगले मिक्स करून साईडला ठेऊन द्या. दुसरीकडे गॅसवर एका पातेल्यात बाकीचे दूध आणि पाणी एकत्र करून ते चांगले उकळवत ठेवा. दूध उकळल्यानंतर त्यात काजू पावडर घाला आणि ते मिश्रण चांगले एकजीव होऊ द्या. त्यात नंतर आवढीनुसार साखर घालून पुन्हा एकदा ते मिश्रण ढवळून घ्या. मिश्रण घट्ट होईपर्यंत हलवत राहा. कस्टर्ड आणि काजू मिश्रण थोडे गार झाल्यावर त्यात वेलची पूड आणि क्रीम घाला. (क्रीम अधिक क्रिमी बनवण्यासाठी वापरली जाते). सर्व मिश्रण चांगले मिक्स करा. हे मिश्रण एका आयसक्रिम मोल्ड किंवा एयरटाइट कंटेनरमध्ये घालून फ्रीझरमध्ये ६-८ तास ठेवून ठेवा. दर १ तासांनी एकदा आयसक्रिम हलवून त्याच्या गुठळ्या मोडा त्यामुळे आईसक्रिम मऊ आणि क्रिमी होईल. आईसक्रिम सेट झाल्यावर तुम्ही काचेच्या बाऊलमध्ये सर्व्ह करू शकता.

हे ही वाचा:

Mumbai Megablock: पश्चिम व मध्य रेल्वे मार्गावर आजपासून २ दिवसीय मेगाब्लॉक

Karnataka मध्ये लवकरच महाराष्ट्रासारखी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता; Congress चा ‘हा’ नेता Eknath Shinde असू शकतात

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss