Saturday, April 20, 2024

Latest Posts

आता ढीगभर लसूण सोला अगदी काही मिनिटांमध्ये…

आपल्याला जेवणात लसणाचा तडका हा लागतोच. लसणाच्या तडाक्याने जेवणाची चव मोठ्या प्रमाणात वाढते. नेहमीच्या आहारात लसूण सेवन केल्याने आपल्या शरीराला अनेक फायदे होतात.

आपल्याला जेवणात लसणाचा तडका हा लागतोच. लसणाच्या तडाक्याने जेवणाची चव मोठ्या प्रमाणात वाढते. नेहमीच्या आहारात लसूण सेवन केल्याने आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. महाराष्ट्र खाद्य संस्कृतीमध्ये लसूण हमखास वापरला जातो. विविध चटण्या, पालेभाज्या यांना चव येण्यासाठीही लसणाचा भरभरून वापर केला जातो. परंतु लसूण सोलणे हे फार कठीण काम असते. रोजच्या स्वयंपाकाला लागणारा लसूण सोलताना हाताची बोटे दुखायला लागतात. कधी कधी तर लसूण सोलण्याचा कंटाळा येऊन जातो.

आपल्या कडील जेवण हे लसनाशिवाय अपुरेच असते. भारतीय पद्धतीचे जेवण लसनाशिवाय तयार होत नाही. काही वेळा आपण लसूण खरेदी करून तो साठवून ठेवतो पण बऱ्याच वेळा साठवलेला लसूण खराब होतो. त्यामुळे आपण स्वयंपाकाच्या वेळेसच लसूण सोलतो पण ते आपल्या जीवा वर येते. चला तर मग बघूया काही सोप्या टिप्स आणि ट्रीक्स ज्याच्यामुळे आपल्याला रोजच्या स्वयंपाकासाठी लसूण सोलणे बरेच सोपे जाईल.

  • सर्वात आधी लसणाच्या पाकळ्या मोकळ्या करून घ्या .काही काळ लसूण पाण्यात ठेवावा जेणे करून लसूण नरम होईल. लसणाचे साल आपोआप निघावे म्हणून लसणाच्या पाकळ्या १० ते १५ मिनिटे गरम पाण्यात भिजवून ठेवाव्यात. भिजवलेल्या पाकळ्या बाहेर काढून नखां ऐवजी दोन बोट चिमटीत पकडून साल काढून घ्यावे. अश्या प्रकारे लसणाचे साल सहज निघून येईल.
  • लसणाच्या पाकळ्या सोलण्याची दुसरी पद्धत अगदी सोपी आहे. या पद्धतीत लसनाच्या पाकळ्या एका टोकदार वस्तूने सोलून त्याचे साल सहज खालून घयावे. उदारणार्थ एखाद्या चाकू ने किंवा कैची ने लसणाच्या पाकळ्या सोलाव्यात.
  • लसणाच्या पाकळ्या मिक्रोवेव्ह मध्ये ३० सेकंड ठेवल्याने सुद्धा सहज सोलता येतात. ३० सेकंद लसूण मिक्रोवेव्ह मध्ये राहिल्याने गरम होतो,जेणेकरून साल सहज निघून जाते.
  • लसणाचा पाकळ्या मोकळ्या करून घ्याव्या. एका गरम तव्यात मीठ टाकून लसणाच्या पाकळ्या १-२ मिनिटे परतल्याने लसणाची साल सहज निघून जातात.
  • जर एकाच वेळी जास्त लसूण सोलायचा असल्यास एका बंद बरणीत लसूण घेऊन ५-६ वेळेस हलवावी, यामुळे लसणाची साल काढणे सहज शक्य होते.

हे ही वाचा : 

Box Office वर सुपरहिट ठरणाऱ्या ‘The kerla story’ साठी अदाने घेतले ‘इतके’ मानधन

समीर वानखेडेंनी सादर केले शाहरुख सोबतचे संभाषण, “माझ्या मुलाची काळजी घे”

Cannes Film Festival मध्ये Urvashi Rautela चा हटके मेकओवर, ‘या’ अभिनेत्रीची कॉपी केल्याची नेटकऱ्यांची टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss