spot_img
Sunday, January 19, 2025

Latest Posts

Palak Dosa Recipe : सकाळी नाश्त्यात काहीतरी झटपट बनवायचं असेल; तर हा डोसा नक्की ट्राय करून बघा

थंडीच्या दिवसात सकाळी गरमा गरम नाश्ता करायची तलप आली असेल तर घरच्याघरी बनवा ‘हा’ डोसा. हा डोसा बनवणे सोपा असून घरातील सदस्यांना देखील नक्की आवडेल. लिहून घ्या याची रेसिपी.

Palak Dosa Recipe : पालक डोसा बनवणे सोपे आहे. या डोस्यामुळे पालकात आढळणारा आयरन हड्ड्यांची मजबूती वाढवतो आणि शरीराला आवश्यक ऑक्सीजन पोहोचवण्यासाठी मदत करतो. डोसा चवदार असून प्रथिने आणि फायबर्सचा चांगला स्त्रोत आहे, जे शरीराच्या कार्यप्रणालीसाठी आवश्यक असतात.यामध्ये कृत्रिम रंग किंवा चवींचा वापर नाही, सर्व काही नैसर्गिक असतो. पालक डोसा बनवण्यासाठी कोणते साहित्य आणि कृती लागते ते बघू.

पालक डोसा बनवण्याचे साहित्य :
> डोसा पीठ
> पालक पेस्ट
> तेल
> खोबऱ्याची चटणी
> बारीक चिरलेला कांदा
> कोथिंबीर
> चिली फ्लेक्स
> मीठ

पालक डोसा बनवण्याची कृती :
पालक डोसा बनवसायासाठी सर्वात आधी एक भांड घ्या त्या डोस्याचे रेडी पीठ किंवा घरी बनवलेले पीठ घ्या. मग पालक चांगले स्वच्छ धुवून घ्या मग ते मध्यम चिरून त्यांची मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्या. डोस्याच्या पिठात ती पेस्ट चांगली मिक्स करा. नंतर मीठ टाकून हे मिश्रण चांगले मिक्स करा. नंतर तवा गरम करा. या पिठात बारिक चिरलेला टोमॅटो, कांदा, चिली फ्लेक्स, कोथिंबीर, खोबऱ्याची चटणी टाका. हे मिश्रण चांगले मिक्स करा. तवा चांगला गरम झाल्यानंतर त्यावर तेल टाकून त्यावर डोस्याचे पीठ पसवुन डोसा चांगला तपकिरी होईपर्यंत भाजून घ्या. तुम्ही दही, किंवा टोमॅटो सॉससोबत डोस्याचा आस्वाद हेऊ शकता.

Latest Posts

Don't Miss