सुट्टीच्या दिवशी तुम्ही घरच्या-घरी ‘पनीर क्युब’ रेसिपी बनवून बघा तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना नक्कीच आवडेल. हि रेसिपी पनीर पासून बनत असल्यामुळे तुमच्या मुलांना देखील हा पदार्थ नक्की आवडेल. कारण पनीर हे हेल्दी आणि पौष्टिक पदार्थ असून त्यात प्रोटीनचे उत्कृष्ट स्रोत आहे. पनीरमध्ये असलेल्या योग्य फॅट्स हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले असतात. हे कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यास मदत करतात. तर ही हेल्दी ‘पनीर क्युब’ रेसिपी घरी नक्की करून बघा. जाणून घ्या याची कृती आणि साहित्य.
‘पनीर क्युब’ रेसिपी बनविण्याचे साहित्य :
> चौकोनी कापलेले पनीर १ बाऊल
> उभा चिरलेला कांदा- १ वाटी
> चिरलेल्या हिरव्या मिरच्या- ८ ते १०
> लसूण पेस्ट २ चमचे
> काळीमिरी पावडर
> टोमॅटो सॉस- १ छोटी वाटी
> लिंबाचा रस- १ छोटी वाटी
> बटर
> मीठ
‘पनीर क्युब’ रेसिपी बनविण्याची कृती :
पनीर क्युब बनवण्यासाठी एका पॅनमध्ये १ चमचा बटर घालून चांगले गरम करून घ्या. त्या लसूण पेस्ट, चिरलेल्या हिरव्या मिरच्या, उभा चिरलेला कांदा, कापलेला टोमॅटो, टोमॅटो सॉस, मीठ घालून हे सगळे मिश्रण टॉस करून घ्यावे. नंतर टॉस केलेल्या मिश्रणात चौकोनी कापलेले पनीर घालून मिश्रण नीट परतून घ्यावे. त्यात काळीमिरी पावडर आणि लिंबाचा रस घालून हे मिश्रण चांगले वाफवून घेऊन कांद्याच्या पतीने गार्निश करावे.
हे ही वाचा:
लाचखोर वनक्षेत्रपालाच्या घराची झडती; 57 तोळं सोनं अन् 1 कोटी 31 लाखांची कॅश
“आता खरी मजा आहे”, Manoj Jarange Patil यांची Devendra Fadnavis यांच्यावर टीका