spot_img
Thursday, March 20, 2025

Latest Posts

प्रो बायोटिक जूस फक्त तुमच्यासाठी; नक्की तयार करून प्या

आपल्या शरीरात बॅक्टेरिया असतो जो शरीरासाठी खूप महत्वाचा असतो. शरीरातील संस्थांचे काम सुरळीत चालण्यासाठी हा बॅक्टेरिया मदत करतो. हे बॅक्टेरिया पचन प्रक्रियेत मदत करतात, पोषक तत्त्वांचे शोषण करतात, आणि इन्फेक्शनपासून संरक्षण देखील करतात. हे बॅक्टेरिया शरीरासाठी फायदेशीर असतात. उदाहरणार्थ, आपल्या पचनसंस्थेतील बॅक्टेरिया जे खाण्याचे अंश पचवून पोटाची स्वच्छता आणि आरोग्य राखतात. त्याचबरोबर हे बॅक्टेरिया स्रोत मिळवण्याचे उत्तम घटक ज्यात असते ते म्हणजे कांजी. कांजी हे उत्तर भारतात बनवले जाणारे ड्रिंक आहे. ज्यात मोठ्या प्रमाणात बायोटिक घटक आढळतो. चला तर मग जाणून घेऊयात कांजी बनवण्याची रेसिपी.

कांजी बनवण्याचे साहित्य:

  • बीट – १ किंवा २
  • गाजर
  • मीठ
  • जिरे पूड
  • हिरवी मिरची
  • पाणी

कांजी बनवण्याची कृती :
एक काचेच्या बरणीमध्ये दिड लिटर पाणी घ्या . एक बीट आणि एक गाजर चिरून घ्या. ३ ते ४ मध्यम तिखट असलेल्या मिरच्या चिरून घ्या. सगळं मिश्रण काचेच्या बरणीत पाण्यामध्ये घाला. त्यामध्ये चमचाभर मीठ, चमचाभर जिरे पूड घाला. नंतर त्या बरणीचे तोंड स्वच्छ फडक्याने बंद करा. दोन दिवस उन्हात ठेवा. मग त्यामधील तुकडे काढून घ्या आणि क्रीजमध्ये ठेवा. गार झाले की थंडगार अशी कांजी प्या. दररोज एक ग्लास भरून कांजी प्यायल्याने शरीरासाठी फायद्याचे ठरेल. कोणत्याही ऋतूमध्ये हि कांजी प्यायल्यास त्याचा फायदा शरीरासाठी महत्वाचा ठरतो. कांजी मध्ये गुड बॅक्टेरिया भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे त्याचे सेवन करणे फायद्याचे ठरेल. शरीरात असलेल्या या “गुड बॅक्टेरियाचा” संतुलन राखणे महत्त्वाचे आहे. जेव्हा या बॅक्टेरियाचा संतुलन बिघडतो, तेव्हा विविध आरोग्य समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

हे ही वाचा : 

Shaktipeeth Expressway : शक्तीपीठ महामार्ग महाराष्ट्रासाठी कसा गेमचेंजर ठरणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दूरदृष्टी

Navneet Rana : औरंगजेबाबद्दल ज्यांना प्रेम आहे त्यांनी आपल्या घरात त्याची कबर लावून घ्या- नवनीत राणा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss