Tricolour Sandwhich Recipe : प्रजासत्ताक दिनादिवशी घरच्या-घरी तिरंगा सँडविच कसे बनवायचे याची साहित्य आणि कृती नक्की लिहून घ्या.
घरच्या-घरी अर्ध्या तासात बनून बघा हे तिरंगा सँडविच, झटपट तयार होणाऱ्या रेसिपींपैकी हि एक आहे. सकाळी खूप घाई झाली असेल किंवा कुठे कामानिमित्त जायचं असेल तर झटपट होणार नाश्ता म्हणजे सँडविच. सँडविच म्हणजे काय? सँडविच म्हणजे दोन तुकड्यांमधील एक पदार्थ, ज्यामध्ये विविध प्रकारचे खाद्यपदार्थ भरले जातात. साधारणपणे, सँडविचमध्ये ब्रेडचे दोन तुकडे घेतले जातात, त्यामध्ये विविध रंगाच्या भाज्या, कधी चिकन, मांस, चीज, सॉस, किंवा इतर विविध पदार्थ भरले जातात. सँडविच हे एक सोयीस्कर आणि लोकप्रिय खाद्य आहे जे सहजपणे तयार करता येते आणि खाल्ले जाऊ शकते. बरेच जण जेवण, नाश्ता म्हणून सॅन्डविचला पसंती देतात. सँडविचचे अनेक प्रकार आहेत. चीज सँडविच, व्हेजिटेबल सँडविच, व्हेज मेयो सँडविच, चॉकलेट सँडविच, ग्रील सँडविच इत्यादी प्रकारांमध्ये आपण सँडविच बनवू शकतो. तर आज प्रजासत्ताक दिनानिमित्त घरच्या घरी बनवा हे तिरंगा सँडविच. नक्की वाचा साहित्य आणि कृती.
‘तिरंगा सँडविच’ बनवण्याचे साहित्य:
- सँडविच ब्रेड स्लाइस – ६ ते ८सँडविच
- हिरवी चटणी – २ टेबलस्पून
- मेयॉनीज – १ टेबलस्पून
- शेजवान सॉस – १ टेबलस्पून
- काकडीच्या गोल चकत्या
- कांद्याच्या गोल चकत्या
- टोमॅटोच्या गोल चकत्या
- चीज स्लाइस आवडीनुसार
- चाट मसाला
- मीठ चवीनुसार
‘तिरंगा सँडविच’ बनवण्याची कृती :
सर्वप्रथम एक ब्रेड स्लाइस घेऊन त्यावर हिरवी चटणी पसरवून घ्या. त्यावर काकडीच्या गोल चकत्या पसरवून घ्या. मग चवीनुसार मीठ आणि चाटमसाला भुरभुरवून घ्या, परत एक ब्रेड स्लाइस ठेऊन त्यावर मेयॉनीज लावून घ्या. मेयॉनीज लावून घेतल्यानंतर त्यावर कांद्याचे गोल चकत्या पसरवून घ्यावे. त्यावर एक चीज स्लाइस ठेवा. आता परत त्यावर एक ब्रेड स्लाइस ठेवा आणि त्याला शेजवान चटणी लावून घ्या. शेजवान चटणी लावल्यानंतर त्यावर टोमॅटोच्या गोल चकत्या ठेवा. त्यावर परत एक ब्रेड स्लाइस ठेवा. तुमचे तिरंगा सँडविच खाण्यासाठी ताराया आहे, हे सँडविच तुम्ही हिरवी चटणीसोबत किंवा सॉस सोबत खाऊ शकता.
हे ही वाचा :
घरच्याघरी पारंपरिक पद्धतीने हुरड्याचे थालीपीठ कधी खाल्ले आहे का? जाणून घ्या सोपी पद्धत