सुट्टीच्या दिवशी नाश्त्यात काय बनवायचं असा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. सुट्टीच्या दिवशी सर्वजण घरी असतात. तो दिवस खास आणि चमचमीत करायला असेल तर कुरकुरीत पालक पनीर पकोडा तयार करून शकता. कुरकुरीत पालक पनीर पकोडा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती काय आहे हे जाणून घ्या.
कुरकुरीत पालक पनीर पकोडा बनवण्यासाठी लागणारे साहित्य :
> पनीर
> पालक
> ओवा
> कांदा पात
> बारीक चिरलेली मिरची
> बारीक चिरलेली कोथिंबीर
> मीठ
> तेल
> लिंबाचा रस
> बेसन
> तांदळाचे पीठ
> लाल तिखट
> हळद
> आमचूर पावडर
कुरकुरीत पालक पनीर पकोडा बनवण्याची कृती :
कुरकुरीत पालक पनीर पकोडा बनवण्यासाठी सर्वात आधी पालक स्वच्छ पाण्याने धुवून घेऊन बारीक चिरावा. एका भांड्यात बारिक चिरलेले पालक, किसलेले पनीर, बारीक चिरलेली मिरची, बारीक चिरलेला कांदा पात, ओवा, मीठ, लाल तिखट, हळद, आमचूर, तांदळाचे पीठ, बेसन, बारीक चिरलेली कोथिंबीर, लिंबू रस हे सर्व साहित्य एकजीव करून चांगले मिक्स करून घ्यावे. नंतर हाताला थोडे तेल लावून छोटे पकोडे किंवा तुम्हाला आवडतील त्या आकारात वळावे. नंतर एका कढईत तेल गरम करून तयार पकोडे त्यात सोडावे. ते पकोडे मंद आचेवर तळून घ्यावे, तयार कुरकुरीत पालक पनीर पकोडा टोमॅटो सॉससोबत सर्व्ह करू शकता.
हे ही वाचा:
लाचखोर वनक्षेत्रपालाच्या घराची झडती; 57 तोळं सोनं अन् 1 कोटी 31 लाखांची कॅश
“आता खरी मजा आहे”, Manoj Jarange Patil यांची Devendra Fadnavis यांच्यावर टीका